आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी 11 वाजता पतीशी बोलत होती NRI महिला, तेव्हा अचानक काही लोकांनी तिला केले किडनॅप, 11 दिवसानंतर मिळाला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिरोजपूर/जालंधर(पंजाब)- 14 मार्चला फिरोजपूर जिल्ह्यातील गाव बग्गेमधून किडनॅप करून घेऊन गेलेल्या एनआरआय महिला रवनीत कौरच्या सोमवारी एका नाल्यात मृतदेह मिळाला. रवनीतला किडनॅप केल्यानंतर पोलिसांनी तपासात केलेल्या दिरंगाईविरूद्ध लोकांनी पोलिस ठाण्यासमोर जोरदार प्रदर्शन केले. महिलेचा भाऊ नरेंद्र केसरने सांगितले की, 20 मार्चला तिला परत ऑस्ट्रेलियाला जायचे होते. 


30 वर्षीय महिला रवनीत कौरचे वडील हरजिंदर सिंगने सांगितले की, पोलिसात तक्रार दिली होती की, त्यांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये पीआर आहे. तिचे लग्न चंडीगडच्या जसप्रीत सिंगसोबत झाले होते. अंदाजे 15 दिवसांपूर्वी ती त्याला भेटायला आली होती. त्या दरम्यान ती त्यांचे गाव बग्गेमध्ये आली होती. 14 मार्च सकाळी 11 वाजता महिलेल्या पती जसप्रीतचा फोन आला आणि त्याला बोलतोबोलता ती घराच्या अंगनात गेली. तेव्हा अचानक काही अज्ञातांनी तिला किडनॅप केले. 
 

बातम्या आणखी आहेत...