आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रियामधील 49 वर्षे जुन्या फुटबॉल स्टेडिअममध्ये लावले 300 झाड, वर्षाला देतील 35380 किलोग्राम ऑक्सिजन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्लॅगनफर्ट- ऑस्ट्रियामधील 49 वर्षे जुन्या "वर्दरसी स्टेडियम"ने एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे. 1960 पासून या स्टेडियमवर फुटबॉल मॅच होत आहेत, पण आता या ठिकाणी मॅच होणार नाहीत. मैदानाच्या मधो-मध 300 झाड लावण्यात आले आहेत. आता स्टेडियममध्ये नागरिक मॅच नाही, तर झाड पाहण्यासाठी येतील. ही झाडे पाहण्यासाठी तिकीटही आहे. 


हे झाडांचे प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारपासून स्टँड्स उघडले जाणार आहेत. एकावेळी 30 हजार लोक स्टँड्समध्ये येऊ शकतात. या झाडांपासून दरवर्षी 35380 (78 हजार पाउंड) किलोग्राम ऑक्सिजन उत्पन्न होईल.

1970 मध्ये पींटनरच्या चित्रातून सुचली कल्पना
1970 मध्ये मॅक्स पींटनरने एक पेंसिल स्केच बनवले होते. या स्केचच्या आधारे वर्दरसी स्टेडियमच्या झाडांच्या प्रोजेक्टचे मॅनेजर क्लॉसने काम केले. यातून प्रेरणा घेऊनच त्यांना स्टेडियममध्ये झाडं लावण्याची कल्पना सुचली.

बातम्या आणखी आहेत...