आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तानच्या इस्लामाबादपासून ६० किमी अंतरावरील हसन अब्दल या गावातील ३००० नागरिक गुहासदृश घरांत राहत अाहेत. ही घरे भूकंप व बाॅम्बरोधक अाहेत. विशेष म्हणजे, शहरांतील घरांच्या तुलनेत खूप स्वस्तही अाहेत. एका घराची किंमत सुमारे ४० हजार रुपये अाहे. याबाबत स्थानिक नगरसेवक हाजी अब्दुल रशीद यांनी सांगितले की, लोक अशा गुहांमध्ये गत ५०० वर्षांपासून राहत अाहेत व मी स्वत:देखील अशाच गुहेत राहताे.
सामान्यपणे या गुहा हातांनीच खाेदून बनवल्या जातात. तसेच घरांच्या भिंतींवर प्लॅस्टर करण्यासाठी मातीचा लेप दिला जाताे. हा परिसर माेगलांनी वसवला असून, सध्या घरांच्या वाढत्या किमतींमुळे अशा घरांची मागणी वाढली अाहे. ही घरे ४० अंशांच्या तापमानात थंड व हिवाळ्यात गरम राहतात, असे गुहेत राहणाऱ्या लाेकांनी सांगितले. यासह पाकमधील हवामानानुसार अशा प्रकारच्या घरांमध्ये राहण्याचा सल्ला अाम्ही इतरांना देत असताे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.