आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपडताळणी प्रमाणपत्र न दिल्याने जिल्ह्यातील ३,०४९ सदस्य अपात्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवरुन निवडून आलेल्या आणि सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द कऱण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ४९ लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द होणार आहे. 

 

नगरपरिषदांच्या १७ नगरसेवकांचा, जिल्हा परिषदेचे ३ सदस्य, पंचायती समितीचे १० आणि ग्रामपंचायतींच्या ३ हजार ३२ सदस्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असून, शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध होताच कारवाईला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता या सदस्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 


या नगरपरिषदांच्या १७ सदस्यांनाही फटका 
मनमाड - १, येवला - १, नांदगाव - १, सटाणा - ३, सिन्नर - २, इगतपुरी - ३, पेठ - १, सुरगाणा - ३, देवळा - १, चांदवड - १ 

बातम्या आणखी आहेत...