आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३२ वर्षीय जवानाची इन्सास रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जवानाने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली

भुसावळ- येथील आर्मीच्या आरपीडी डेपोत कर्तव्यावर असलेल्या टेरिटोरीयल आर्मीच्या ११८ नंबरच्या बटालियनमधील ३२ वर्षीय जवानाने, इन्सास रायफल हनुवटीला लावून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ११.० वाजता ही घटना घडली. मंगेश भगत (वय ३२, रा. चिखली पो.सोनाटी, जि. मुर्तीजापूर) असे मृत जवानाचे नाव आहे. जवानाने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

आरपीडी डेपोतील जवान मंगेश भगत हे बुधवारी कर्तव्यावर होते. ससकाळी त्यांनी आत्महत्या केल्याने आरपीडी डेपोत खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल चाैधरी, विनोद तडवी, नागेंद्र तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत भगत हे येथे एकटेच राहत होते. ते आरपीडी सेक्शनमध्ये कार्यरत होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती जवानाच्या कुटुंबियांना कळवण्यात आली.