आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 32 Year Old Woman Woke Up In The Past Thinking She Is 15, All About Dissociative Amnesia

झोपताना 32 वर्षांची, उठली तेव्हा अचानक 15 ची झाली ही महिला; डॉक्टरांनाही करावे लागले मान्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅनचेस्टर - ऐकण्यात विचित्र वाटत असली तरी ही घटना खरोखर घडली आहे. ही सत्यकथा ब्रिटनच्या एका 32 वर्षीय महिलेची आहे. जी एक दिवस झोपेनंतर उठली तेव्हा ती आपल्या आयुष्यात 17 वर्षे मागे गेली होती. झोपेतून उठल्यानंतर ती 32 नव्हे, तर 15 वर्षांची झाली होती. आपल्याच घरात असतानाही तिला काहीच कळत नव्हते. घरातील वस्तू तर सोडाच ती आपल्या मुलाला देखील ओळखत नव्हती. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा तिने आरसा पाहिला. आरशात दिसणारा चेहरा आपलाच असल्याचा तिला विश्वास बसत नव्हता. आपला आवाजही ऐकूण तिला झटका बसला. एखादे दुःस्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची भीती तिला वाटत होती. या महिलेला डॉक्टरांनी डिसोसिएटिव्ह एमनिशिया झाल्याचे स्पष्ट केले. यात माणूस आपल्या आयुष्यातील ठराविक कालखंड पूर्णपणे विसरून जातो. 


असा होता त्या दिवसाचा अनुभव
- मॅनचेस्टरमध्ये राहणारी नाओमी जेकब्स 2008 मध्ये आपल्या छोट्याशा घरात सकाळी उठताच हैराण झाली. 32 वर्षांची असतानाही ती स्वतःला 15 वर्षांची समजत होती. तिचे मेंदू 1992 मध्ये गेले होते. यानंतरही एकही दिवस तिला आठवत नव्हता. काही सेकंद तिला आपण स्वप्नात असल्याचा भास झाला. परंतु, हे काही स्वप्न नव्हते. 
- तिला आपण ज्या घरात आहोत ते आपलेच असल्याचे सुद्धा लक्षात नव्हते. नाओमीने सांगितले, की "आरशात पाहिले तेव्हा एक 32 वर्षांची महिला दिसून आली. ती महिला आपणच आहोत यावर मला विश्वास बसत नव्हता. मी 1992 मध्ये जगत होते. प्रत्यक्षात कॅलेंडरमध्ये 2008 वर्ष सुरू होते. मी पुन्हा-पुन्हा कॅलेंडर आणि आरशात स्वतःला पाहत होते."
- नाओमी 1992 चे वर्ष सुरू असल्याचे समजत होती. त्यावेळी स्मार्टफोन तर सोडा घरात मोबाईल फोन सुद्धा नव्हते. अशात घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहून तिला धक्का बसला. यानंतर तिच्या 10 वर्षीय मुलाने हाक मारली. तेव्हा आपल्याला मुलगा देखील आहे यावर तिला विश्वास बसत नव्हता. 
- 15 वर्षांची असताना नाओमी पत्रकार होऊ इच्छित होती. परंतु, प्रत्यक्षात आपण एक बेरोजगार असून सिंगल मदर आहोत हे ऐकूण नाओमीला धक्का बसला होता. आपल्याला पैश्यांसाठी सरकारच्या फंड्सवर विसंबूर राहावे लागेल याचा तिने विचारही केला नव्हता. 

 

मग घेतली बहिणीची मदत 
नाओमीला नेमके काय झाले याचा काहीच पत्ता लागत नव्हता. उपचारासाठी तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु, डॉक्टरांच्या उपचाराचा तिला काहीच फायदा झाला नाही. यानंतर तिने स्वतःवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू केले. यासाठी तिने आपली बहिण आणि सर्वात चांगली मैत्रिण केटीची मदत घेतली. तिनेच नाओमीला एक जुने बॉक्स दाखवले. त्यामध्ये नाओमीने गेल्या काही वर्षांत न्यूजपेपर भरून ठेवले होते. त्यामध्ये नाओमीने लिहिलेले काही लेख सुद्धा होते. याच पेपर्समधून नाओमीला अमली पदार्थांच्या व्यसनात आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली. ड्रग्समुळेच आपले घर विकावे लागले आणि बिझनेस बंद पडले याची जाणीव बहिणीने नाओमीला करून दिली. लहानपणी आई-वडिलांचा घटस्फोट आणि 6 वर्षांची असताना लैंगिक शोषण झाल्याची माहिती सुद्धा मिळाली. 


बरे होण्यासाठी लागले 3 महीने
आता नाओमी पूर्णपणे बरी झाली आहे. स्मृतीभ्रंश झाल्याच्या 3 महिन्यांनंतर तिने आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्वच घटनांची माहिती गोळा केली. यानंतर एक दिवस झोपेतून उठल्यानंतर ती पुन्हा आपल्या सामान्य वयात आली होती. या घटनेच्या 3 वर्षांनंतर तिने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यामध्ये नाओमीला डिसोसिएटिव्ह एमनिशिया (Dissociative Amnesia) झाला होता अशी माहिती मिळाली. इंटरनेट किंवा पुस्तकांमध्ये सुद्धा या अवस्थेवर फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे, आपल्यासारख्या इतरांची मदत करण्यासाठी नाओमीने मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि 'द फॉरगॉटन गर्ल' नावाचे पुस्तक काढून त्याचे सविस्तर विश्लेषण सुद्धा केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...