आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासकॉपीमुळे 321 विद्यार्थांचा निकाल अद्याप राखीव, पालकांनी बोर्डात घातला गोंधळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदेगाव- दहावी बोर्डाच्या परिक्षेत येथील सरस्वती भुवन केंद्रावर मासकॉपीचा प्रकार घडला होता. त्यानंतर या केंद्रावरील 321 मुलांचे निकाल मंडळाने राखीव ठेवले होते, ते निकाल अद्यापही लागलेले नाहीत. सध्या सगळीकडे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आह. अशातच या मुलांचे निकाल लागले नाही तर त्यांचं वर्ष वाया जाईल यामुळे केंद्रावरील 321 मुलांच्या पालकांनी निकाल मिळावा म्हणून बोर्डात गर्दी केली आहे. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली.


शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने 11 मार्चला गोंदेगाव येथील सरस्वती भुवन शाळेला भेट दिली. त्यादिवशी बीजगणितचा पेपर सुरू होता, त्यावेळेस मास कॉपी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कार्बनच्या मदतीने एकाच हस्ताक्षरातील कॉपी समोर आली. यात शंभरपेक्षा जास्त प्रती शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने जप्त केल्या, सोबतच मोठ्या प्रमाणात कॉपी जप्त करण्यात आली. संबंधित घटनेनंतर संबंधित केंद्राच्या केंद्र संचालकाची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

 

या प्रकारची उत्तरे देणाऱ्या अणि अशाप्रकारे मास कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकाची माहिती घेण्यात आली. चौकशीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल मंडळाला सादर केला. मंडळाकडून कारवाईची प्रक्रिया करण्यात आली. केंद्रपमुख, शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. पण, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. दहावीच्या निकालात या प्रकरणात 321 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यातील या शाळेचे 253 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना चौकशी समिती समोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या निकालाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली नाही.