आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3,239 Candidates Contesting In The Assembly Election Additional Chief Electoral Officer Dilip Shinde

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २८८ जागांसाठी ३२३९ उमेदवार रिंगणात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात २८८ मतदारसंघात १५०४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता एकूण ३२३९ उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त २४६ उमेदवार पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी २३ उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक लढवत आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली. शनिवारी झालेल्या छाननीअंती ४७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून साेमवारी १५०४ उमेदवारांनी माघार घेतली. 
 

उत्तर महाराष्ट्र - 
नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६, धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३८, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १००,  नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात १४८ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ११६ उमेदवार रिंगणात आहेत. 

विदर्भ :
बुलडाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ५९, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ६८, वाशीम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०९, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४७, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १४६, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४२, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४७, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३८, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ७१, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ८८ उमेदवार रिंगणात आहेत.

मराठवाडा :
देड जिल्ह्यात ९ मतदारसंघात १३५, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३३, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५३, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७९, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात १२८, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११५, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ७९, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५० उमेदवार मैदानात आहेत.

मुंबई/ काेकण :
पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ५३, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३२, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २३, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २१४, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात २४४, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८९ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७८ उमेदवार रिंगणात आहेत.

पश्चिम महाराष्ट्र :
पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात २४६, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ७३, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले.
 

सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये, सर्वात कमी चिपळूणमध्ये
> रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात सर्वात कमी तीनच उमेदवार आहेत. तर मराठवाड्यातील नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात ३१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी ३ बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता असेल. कंट्रोल युनिट (सीयु) मात्र एकच लागणार आहे. 
> नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. मात्र माघारीनंतर केवळ ७ उमेदवारच निवडणूक रिंगणात आहेत.
>  अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा ३० मतदारसंघांत १५ पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. 
 

राज्यात तब्बल ११ काेटींची राेकड जप्त
आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात ११ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड, १२ कोटी ४७ लाख रुपयांची दारू, १५ कोटी २९ लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ तसेच ८ कोटी ८७ लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व दागिने असा सुमारे ४८ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.