आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात 33 उमेदवारांनी सोडले निवडणुकीचे मैदान; आता 68 उमेदवार रिंगणात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून 33 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 68 उमेदवार मैदानात उरले आहेत. बाळापूर व मुर्तीजापूर मतदारसंघातून प्रत्येकी 9 उमेदवारांनी माघार घेतली आहे. अकोला पश्चिममधून 6, अकोला पूर्व मधून 5 तर अकोट मतदारसंघातून 4 जणांनी निवडणुकीचे मैदान सोडले आहे. 

माघार घेणाऱ्यांमध्ये अकोला पश्चिमचे अशोक ओळंबे, रोहित तिवारी, शेर खान साहेब खान, जगन्नाथ मेश्राम, नकीर खान अहमद खान व रेखा घरडे यांचा समावेश आहे. अकोला पूर्वचे भाई बी. सी. कांबळे, दीपंकर तेलगोटे, हनीफ रसुल शेख, सुधाकर पवार व डॉ. दशरथ भांडे यांनी माघात घेतली आहे. बाळापुर मतदारसंघातील केशव बिलबिले, शोभा शेळके, सचिन गणगणे व संतोष हुशे, बाळापुरमधाल गजानन दांदळे, तसलीम शेख करीम शेख, नारायणराव गव्हाणकर, पंढरी हाडोळे, बळीराम सिरस्कार, ब्रम्हदेव इंगळे, मुशर्रीफ अहमद गुलाम अहमद व संदीप पाटील आणि मुर्तिजापूर मतदारसंघातील तुषार दाभाडे, दयाराम घोडे, धनराज खिराडे, बाबुलाल इंगळे, रामेश्वर जामनीकर, शरद गवई, सम्राट डोंगरदिवे व सुरेश गोपकर यांनी निवडणुकीचे मैदान सोडले आहे. 

माघारीनंतर अकोट मतदारसंघात सर्वाधिक 17 उमेदवार उरले असून अकोला पश्चिमच्या मैदानात सर्वात कमी 9 जण ठाण मांडून बसले आहेत. बाळापुरमध्ये 15, मुर्तीजापुरमध्ये 14 तर अकोला पूर्वमध्ये 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.