आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 33% Of The State's 3 Million Voters Are Connected To Social Media; BJP NDA Has 48 Per Cent And Congress UPA's 26 Per Cent

राज्यातील 33% म्हणजेच 3 कोटी मतदार सोशल मीडियाशी कनेक्ट; भाजप-एनडीएचे 48 टक्के, तर काँग्रेस-यूपीएचे 26 टक्क्यांवर समर्थक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अवघ्या काही वर्षांपूर्वी 'क्रेझ' म्हणून अवतरलेला सोशल मीडिया आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला आहे. एकेकाळी गल्लोगल्लीत रंगणारी प्रचाराची रणधुमाळी आणि चावडीवरच्या गप्पा आता सोशल मीडियावरच रंगताना दिसतात. सरकार बनवणे किंवा पाडणेही सोशल मीडियाच्या अावाक्यात आल्याची उदाहरणे आहेत. एका अभ्यासानुसार राज्यातील तब्बल ३३ टक्के मतदार सोशल मीडियावर आहेत. ४ ऑक्टोबरपर्यंतच्या मतदार नोंदणीनुसार राज्यातील एकूण मतदारांचा आकडा ८ कोटी ९८ लाखांवर पोहोचला आहे. ३३ टक्क्यांच्या ढोबळ हिशेबाने राज्यातील सोशल मीडिया युजर्स मतदार तब्बल तीन कोटींच्या जवळपास जातात. यामुळे बहुतांश पक्ष सोशल मीडियाचा अत्यंत जोरदार वापर करत असल्याचे चित्र आहे.
राजकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या दिल्लीच्या लोकनीती आणि सीएसडीएस संस्थांनी 'भारतीय समाज माध्यमे आणि मतदारांचे वर्तन' अशी देशव्यापी संयुक्त पाहणी केली होती. त्याचा अहवाल जून २०१९ मध्ये प्रकाशित झाला असून त्यात भारतीय मतदारांवरील समाज माध्यमांच्या प्रभावाची गुपिते उघड झाली आहेत.

राज्यातील सोशल मीडिया युजर्स
62 % - महानगरांमधील मतदार
47 % - लहान शहरांतील
30 % - खेड्यातील मतदार

हेही वास्तव दुर्लक्षिता येणार नाही
66% - मतदार भारतातील सोशल मीडियावर नाहीत.
03% - मतदार राजकीय बातम्यांसाठी सोशल मीडिया पाहतात.
75% - महिला अद्यापही सोशल मीडियावर नाहीत.
1/3% -आहे सोशल मीडिया युजर महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत.

सोशल मीडियावर कुणाचे किती पाठीराखे
17 % - प्रादेशिक पक्षांचे पाठीराखे
08 % - बसपसह दलित पक्षांचे समर्थक
48 % - भाजप समर्थक सर्वाधिक सक्रिय
26 % - काँग्रेस (यूपीए) समर्थक
01 % - डाव्या पक्षांचे समर्थक

वापरकर्ते मतदार कोणत्या वर्गातील ?
वर्ग - एनडीए - यूपीए - दलित - पक्ष - इतर पक्ष
उच्चजातीय - 65% - 18% - 01% - 6%
ओबीसी - 55% - 28% - 04% - 12%
एससी - 42% - 38% - 04% - 15%
एसटी - 57% - 26% - 10% - 07%
मुस्लिम - 15% - 39% - 25% - 03%

राजकीय घडामोडी; यावर अवलंबून
07% - आकाशवाणी
18% - वर्तमानपत्रे
35% - न्यूज चॅनल्स

असे आहे वर्तन सोशल मीडियावरील युजर्सचे
54% - युजर्स आपली राजकीय मते व्यक्त करत नाहीत
56% - युजर्स त्यांना आलेल्या पोस्ट्स फाॅरवर्ड करतात
47% - युजर्स केवळ राजकीय बातम्यांचे वाचन करतात

पाच वर्षांत वापर तिपटीहून जास्त
२०१४ ते २०१९ या काळात फेसबुकचा वापर तीनपट, व्हाॅट‌्सअॅपचा ५ पट, यूट्यूबचा ३ पट व ट्विटरचा ६ पट वाढला. दक्षिण भारत सोशल मीडियाच्या वापरात पुढे आहे. महाराष्ट्रात ३३ टक्के मतदार समाज माध्यमांचा वापर करतात.

समाज माध्यमांवर भाजपचे ४२ टक्के पाठीराखे राजकीय मते व्यक्त करतात. काँग्रेसचे ४० टक्के, बसपचे ४८ टक्के, डाव्या पक्षांचे २२ टक्के पाठीराखे व्यक्त होतात. दैनंदिन व्यक्त होण्यात भाजप समर्थक पुढे आहेत.
भाजप व सहकारी पक्षांना (एनडीए)

कंटेंटमध्ये मात्र बसप पुढे
भाजपची धोरणे, मते व योजना ३९ टक्के शेअर होतात. काँग्रेसची ३६ टक्के, बसपची ४२ टक्के, डाव्या पक्षांचा ३३ टक्के कंटेंट शेअर होतो. दैनंदिन कंटंेट शेअरमध्ये बसप पुढे आहे.

सोशल मीडियावर प्रभुत्व कुणाचे?
सोशल मीडियाच्या दैनंदिन वापरकर्त्यांत सवर्ण जाती १५ टक्के, इतर मागासवर्गीय ९ टक्के, अनुसूचित जाती ८ टक्के, अनुसूचित जमाती ७ टक्के, मुस्लिम १० टक्के आणि इतर १२ टक्के इतक्या युजर्सचा समावेश आहे.