Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | 33 thousand stolen from ATM

कार्ड चाेरून एटीएममधून ३३ हजार रुपये लांबवले

प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 09:19 AM IST

एका संशयिताला अटक, पसार दाेघांचा शाेध सुरू

  • 33 thousand stolen from ATM

    जळगाव- यशवंत नगरातील घरातून एटीएम चाेरून त्याव्दारे एटीएम मशीनमधून ३३ हजार रूपये काढून घेणाऱ्या संशयितास शुक्रवारी सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपींचा शाेध सुरू आहे.


    प्रशांत संजय इंगळे, (वय २२ रा. पिंप्राळा असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. यशवंतनगरातील रूपल लिलाधर अत्तरदे (वय ३७) या नोकरदाराच्या घरातून आरोपींनी २४ ऑक्टोबर रोजी रात्री अॅक्सीस बंॅकेचे एटीएम कार्ड चोरून नेले होते. त्यावर लिहिलेल्या पीन क्रमांकाच्या आधारे बंॅक आॅफ इंडियाच्या पद्मालया कॉर्नरवरील एटीएममधून रात्री तीन वेळा ३३ हजार रूपये काढले होते. या प्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी अत्तरदे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी गुरूवारी रात्री प्रशांत इंगळेला अटक केली. अर्जुन सुरेश बंदे व हर्षल अनिल सोनार रा. पिंप्राळा हे दोघे संशयित फरार आहेत. तिघांनी हा गुन्हा केल्याचे सीसीटीव्हीत दिसले. सायबर पोलिसांनी शुक्रवारी इंगळे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Trending