आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामानंद सागर यांनी रस्त्यावर कधी साबण विकला तर कधी शिपायाचे काम केले, मुलाने कपिल शर्माच्या कार्यक्रमात सांगितली कहाणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क. 'रामायण' या धार्मिक मालिकेला 33 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेतील प्रमुख कलाकार नुकतेच 'द कपिल शर्मा शो' मध्ये भाग घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मालिकेशी संबंधित आपले अनुभवही सांगितले. त्यांच्यासमवेत या मालिकेचे निर्माता-दिग्दर्शक रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागरसुद्धा सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाविषयी सांगितले. 

चॅनलने प्रसिद्ध केलेल्या शोच्या प्रोमोमध्ये प्रेम सागर कपिलला त्यांचे वडील रामानंद सागरबद्दल सांगताना म्हणाले की, "या पुस्तकाचे नाव 'अॅन एपिक लाइक ऑफ रामानंद सागर फ्रॉम बरसात टू रामायण' असे आहे. ते पुढे म्हणाले, "1949 मध्ये, पापाजींचा  (रामानंद सागर) पहिला चित्रपट बरसात हा होता. एक व्यक्ती ज्याने शिपाई म्हणून काम केले, रस्त्यावर साबण विकले, पत्रकार आणि लेखापाल बनला. ती व्यक्ती एकेदिवशी रामायण बनवू शकली.'

नातवाने केले पुस्तकासाठी संशोधन

या शोमध्ये रामानंद सागर यांचे नातू आणि प्रेम सागर यांचा मुलगा शिव सागरही उपस्थित होते, ज्यांनी आपल्या आजोबांच्या जीवनावर आणि कार्याबद्दल लिहिलेले पुस्तकासाठी संशोधन केले.  शिव म्हणाले की, हे पुस्तक लिहिण्यास आम्हाला तीन वर्षे लागली. मी या पुस्तकावर संशोधन केले आणि पापाने ते लिहिले. यात आम्ही आजोबांशी संबंधित अनेक जुने फोटो आणि कागदपत्रांविषयी सांगितले. या पुस्तकात ते मुंबईतील देवानंदबरोबरचा ट्रेनच्या थर्ड क्लासमध्ये प्रवास करतानाचा फोटो आहे. याशिवाय त्यांच्याशी संबंधित कथा पुस्तकात सांगितल्या आहेत.

या कार्यक्रमात राम, सीता आणि लक्ष्मण यांचे झाले आगमन

द कपिल शर्मा शोच्या या एपिसोडमध्ये रामायणमध्ये रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, सीता अर्थातच अभिनेत्री दीपिका चिखलिया, लक्ष्मणची भूमिका वठवणारे अभिनेते सुनील लहरी यांनीही हजेरी लावली. कपिलने त्याच्या खुमासदार प्रश्नांनी सगळ्यांना हसून हसून लोटपोट केले. 1987 ते 1988 दरम्यान, रामायण शो टीव्हीवर खूप लोकप्रिय होता. रामानंद सागर दिग्दर्शित हा कार्यक्रम रविवारी दूरदर्शनवर प्रसारित होताना रस्ते निर्जन असायचे आणि लोक प्रत्येक पात्राला देव मानत.

बातम्या आणखी आहेत...