आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले 'राम', 'सीता' आणि 'लक्ष्मण', कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः 'द कपिल शर्मा शो' या मालिकेत 'रामायण' ची स्टारकास्ट हजेरी लावणार आहे. या मालिकेला 33 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कपिलने या मालितेकील कलाकारांना खास आमंत्रित केले आहे. सोनी टीव्ही आणि कपिल शर्माने या खास भागाचा एक प्रोमो रिलीज केला आहेत, यात रामची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, सीता अर्थातच अभिनेत्री दीपिका चिखलिया, लक्ष्मणची भूमिका वठवणारे अभिनेते सुनील लहरी दिसत आहेत.  कपिलने त्याच्या खुमासदार प्रश्नांनी सगळ्यांना हसून हसून लोटपोट केले.

कपिलने विचारले, कधी वाटले नाही का, की आपणच देव आहोत

कपिलने अरुण गोविल यांना म्हणाला, लोक तुम्हाला बघून तुमची आरती करायला सुरवात करायचे, सर, तुमच्या मनात कधी आले नव्हते का की, 'आपणच देव आहोत'. याशिवाय कपिलने आणखी एक मजेदार किस्सा शेअर करताना सांगितले, 'आज मी तुम्हाला दुस-यांदा भेटत आहे, कारण पहिली भेट तुम्हाला आठवणार नाही. एकदा विमानतळावर, जी बस आपल्याला एअरक्राफ्टपर्यंत घेऊन जाते, त्यात मी बसलो होतो, तेव्हा अचानक तुम्ही माझ्या समोर आलात, तर मी उठलो आणि उभा राहिलो, कारण आतून आवाज आला की प्रभू आले आहेत.
 
दीपिकाला म्हटले सुनील शेट्टीची बहीण

सीतेच्या भूमिकेत झळकलेल्या दीपिका यांना ख-या आयुष्यात लोक सीता सीता मानू लागले होते, म्हणून जर कोणी सेटवरही भेटायला आला तर तो थेट त्यांचे पाय स्पर्श करून नमस्कार करायचा, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितले.  कपिल दीपिका यांच्याशी बोलताना विनोदी पद्धतीने म्हणाला की, तुम्ही सुनील शेट्टीची बहीण आहात कारण ते म्हणतात की, धरती माझी आई आहे आणि तुम्ही धरतीची मुलगी आहात. 

अत्यंत लोकप्रिय होती मालिका

1987 ते 1988 दरम्यान, रामायण शो टीव्हीवर खूप लोकप्रिय होता. रामानंद सागर दिग्दर्शित हा कार्यक्रम रविवारी दूरदर्शनवर प्रसारित होताना रस्ते निर्जन असायचे आणि लोक प्रत्येक पात्राला देव मानत.