आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार प्रकरणी \'या\' काँग्रेस आमदाराला अटक, विधानसभेत प्रश्न न विचारण्यासाठी झाली होती 35 लाखांची डील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- विधानसभेत प्रश्न विचारु नये यासाठी केली 40 लाखांची सैादेबाजी

- 10 लाख रोख आणि 25 लाखांचा चेक 

 

सुरेंद्रनगर - हलवद-ध्रांगध्राचे काँग्रेस आमदार पुरुषोत्तम साबरिया आणि त्यांचा वकील मोरबी एलसीबीए या दोघांना रविवारी अटक करण्यात आली. गुजरातच्या राजकारणात हा विषयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साबरिया यांच्यावर तलाव निर्मितीत झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी सिंचन विभागातील आधिकाऱ्यांकडून 40 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे.


20.31 कोटींच्या कामांना मिळाली होती मंजुरी

> मोरबी जिल्ह्यासोबतच हलवद, वांकानेर, टंकारा, मालिया या गावात डॅम आणि सिंचन दुरुस्ती सोबत इतर 334 कामांसाठी 20.31 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. यात हलवद जिल्ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल विधानसभेत प्रश्न न विचारण्यासाठी आमदार पुरुषोत्तम साबरिया आणि त्यांचे वकील देवजी भाई गणेशिया यांनी 40 लाखांची लाच मागितली होती. यानंतर 35 लाखांत सैादा झाला होता. त्यापैकी 10 लाख रोख तर 25 लाख चेकच्या मार्फत घेतले.

> हलवद आणि मोरबी जिल्ह्यात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती गांधीनगर पर्यंत गेली. या प्रकरणाच्या चैाकशीसाठी एक विशेष पथक बोलवण्यात आले. या पथकाने गावा-गावात जाउन तळे आणि अन्य कामात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती गोळा केली. यानंतरच भ्रष्टाचार उघडकीस आले. 

 

असा झाला घोटाळा...

हलवद तहसीलच्या 51 गावांच्या तळे, धरण आणि सिंचन दुरुस्तीसह 100 कामांना मंजुरी मिळाली होती. या अंतर्गत कार्यकारी अभियंता आणि इतर मंडळींनी कोणत्याही कामाशिवाय कंत्राटदारांना पैसे दिले. हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही नेत्यांना पैसे सुद्धा देण्यात आले.      


जनसंपर्क कार्यालय उद्घाटनाच्या आधीच पकडले
हलवद-ध्रांगध्रा हाई वे वर रविवारी साबरिया जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन करणार होते. पण उद्घाटनापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...