आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 35 Meetings And Five Road Shows In Six Days, Chief Minister's Leadership In Election Campaign In Forty Constituencies

MahaElection : सहा दिवसांत ३५ सभा, पाच रोड शो, चाळीस मतदारसंघांतून मुख्यमंत्र्यांची प्रचारात आघाडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - प्रत्येक जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची आकडेवारी, मागच्या सरकारच्या कामगिरीशी तुलनात्मक मांडणी, पाच वर्षांत ताब्यात घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विस्तार, मोदींच्या नावाचे चलनी नाणे, पक्ष संघटनेचे काटेकोर नियोजन, वाहन- भोजन - प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, आक्रमक आवाहन आणि टीम सीएमचे नियंत्रण या जोरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. महाजनादेश यात्रेच्या गेल्या ६ दिवसांत त्यानी ३५ जाहीर सभा आणि ५ रोड शो घेऊन विदर्भातील १० जिल्ह्यांतील ४० मतदारसंघांत प्रचाराची पहिली फेरी मोठ्या धडाक्यात पूर्ण केली.

“पुन्हा आणूया आपले सरकार’ ही घोषणा देत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पुढचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत भाजपने महाराष्ट्रात प्रचारात मुसंडी मारली आहे. 
 

सपाटा झाला तरी आघाडीची मुजोरी उतरली नाही
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील विरोधकांचा सपाटा झाला तरी काँग्रेस-राष्ट्रवादीची मुजोरी उतरली नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत केली. यवतमाळ जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात ते बोलत होते.  पाच दिवसांपासून विकासाचा पाढा वाचणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका सुरू केली आहे.
 

महिलांसाठी केली खास वाहन व्यवस्था
गडचिरोलीतील रात्रीच्या सभेनंतर लोकांना राहण्यासाठी कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. सरकारच्या लाइव्हलीहूड मिशनच्या माध्यमातून एकत्र करण्यात आलेल्या बचत गटांच्या महिलांना प्रत्येक सभेत खास वाहन व्यवस्था करून आणले जात आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...