आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच वर्षांच्या आतील नवीन वाहनांमुळे 35% अपघात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : जुन्या वाहनांच्या तुलनेत पाच वर्षापूर्वीच्या वाहनांचे जास्त अपघात होत आहेत. ५ वर्षे जुन्या वाहनांचे ३५ टक्क्यांपेक्षा जास्त अपघात झाले आहेत. ५ ते १० वर्षे जुन्या वाहनांचे २८ टक्के आणि १० ते १५ वर्षे जुन्या वाहनांचे केवळ १३ टक्के अपघात झाले आहेत.
तज्ञांच्या मतानुसार याच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे अती वेग. अहवालानुसार ६६ टक्के अपघात अती वेगामुळे झाले आहेत. देशभरात ५ वर्षे जुन्या वाहनांची संख्या एकूण वाहनांच्या सुमारे ४५ टक्के आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात अपघातग्रस्त वाहनांना वयाच्या हिशेबाने ५ भागांत विभागले आहे. यात ५ वर्षांपर्यत, ५ ते १० वर्षे, १० ते १५ वर्षे, १५ वर्षांपेक्षा जास्त. तसेच, अशी वाहनेही आहेत ज्यांच्या वयाची माहिती नाही.अति वेग; देखभालीकडे दुर्लक्ष, अपघातांचे कारण


सेव्ह लाइफ फाउंडेशनचे सीईओ पीयूष तिवारी यांच्या मते ३० टक्क्यांपेक्षा जास्त अपघात महामार्गावर होतात. लोक महामार्गावर नवीन वाहने वापरतात. जुने वाहन नेत नाहीत. चालक अप्रशिक्षित असणे हेही एक कारण आहे. अराइव्ह सेव्हचे संचालक हरमन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, जे लोक नवीन वाहन खरेदी करतात, त्यांचा हनिमून पिरियड असतो. यामुळे वेगाने वाहने चालवली जातात. ड्राइव्ह स्मार्ट-ड्राइव्ह सेव्हचे संचालक आर. एस. पांडे यांच्या माहितीनुसार नवीन वाहन वेगात असणे व वाहनांची संख्या जास्त हे अपघाताचे कारण आहे. सोसायटी आॅफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सचे सचिव सुगांतो सेन सांगतात की, रस्त्यावर ५ वर्षांआतील वाहनांची संख्या जास्त अाहे.दररोज होतो १३० बाइकस्वारांचा मृत्यू


अहवालानुसार रस्ते अपघातात बाइकस्वारांचा सर्वाधिक मृत्यू होतो. अपघातांमध्ये ३५ टक्के बाइकस्वारांचा समावेश असतो. मृत्यूच्या प्रमाणातही ३१ टक्के बाइकस्वार असतात. २०१७ मध्ये १ लाख ५७ हजार ७२३ वरून २०१८ मध्ये बाइकस्वारांचा आकडा १ लाख ६४ हजार ३१३ वर गेला.