Home | Editorial | Columns | 35% of world refining gold in Switzerland, robot production of gold bricks

जगातील 35% सोने शुद्धीकरण स्वित्झर्लंडमध्ये, रोबोटकडून सोन्याच्या विटांची निर्मिती

धर्मेंद्रसिंह भदौरिया | Update - Nov 07, 2018, 06:49 AM IST

एवढ्या किमतीत ही खरेदी झाली होती. त्यानंतर ती जगात सर्वाधिक सोने निर्यात करणारी कंपनी बनली.

 • 35% of world refining gold in Switzerland, robot production of gold bricks

  जगातील सर्वात मोठा सोने शुद्धीकरण कारखाना स्वित्झर्लंडमधील बलरेना शहरात आहे. इटलीच्या सीमेवर कारखाना उभारण्यात आलेला आहे. दर वर्षाला दोन हजार मेट्रिक टन सोने येथे शुद्ध होते. १९६३ मध्ये स्थापन झालेला हा कारखाना राजेश एक्स्पोर्ट््स या भारतीय कंपनीने २०१५ मध्ये अधिग्रहित केला होता. त्या वेळी ४० कोटी डॉलर (आजच्या किमतीत सुमारे २८८० कोटी रुपये) एवढ्या किमतीत ही खरेदी झाली होती. त्यानंतर ती जगात सर्वाधिक सोने निर्यात करणारी कंपनी बनली.


  बंगळुरूतील कुमारा कुरूपा पार्कजवळील बताविया चेम्बर्स येथील कंपनीच्या कार्यालयात आम्ही पोहोचलो तेव्हा तेथे महागडा गाड्यांचा ताफा उभा होता. कंपनीच्या अत्यंत सुरक्षित कक्षात अध्यक्ष राजेश मेहता बसले होते. तिथे जाण्यासाठी तीन टप्प्यांतील सुरक्षा साखळीतून जावे लागते. मेहता यांनी झालेल्या विशेष चर्चेत सांगितले की, कारखान्यात दरवर्षी सुमारे १२०० टन सोने शुद्धीकरण केले जाते. अमेरिकेसह युरोपातील बहुतांश देशांतील केंद्रीय बँका आणि प्रमुख बुलियन बँकांना येथून सोन्याचा पुरवठा केला जातो. जगात जेवढे सोने शुद्धीकरण केले जाते, त्यापैकी ३५ टक्के शुद्धीकरण या कारखान्यात होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील पर्थमिंट कारखान्याचा क्रमांक येते. त्याची शुद्धीकरण क्षमता वर्षाला ५०० मेट्रिक टन एवढी आहे.


  मेहता यांनी सोने शुद्धीकरणाची ही प्रक्रिया वर्णन करताना म्हटले की, या मोठ्या
  पात्रात ही द्रवरूपातील सोन्याची धार पडत आहे. या पात्रात सुमारे ४०० किलो सोने आहे. ज्या भांड्यातून सोने पडत आहे, त्याची क्षमता ३० किलो एवढी आहे. सोने हा जड धातू असल्यामुळे कारागिरांकडून होणाऱ्या प्रक्रियेत एक फूट उंच आणि अर्धा फूट व्यास असलेल्या भांड्यातून आम्ही ३० किलो सोने टाकतो. स्वयंचलित प्रक्रियेत याच भांड्यातून सुमारे १०० किलोपर्यंत सोने टाकले जाते. मेहता सांगतात, कारखान्यात बहुतांश काम यंत्रांद्वारे होत. मानवी हस्तक्षेपाशिवाय रोबोटिक प्रक्रियेतून सोन्याच्या विटा बनवणारा हा जगातला एकमेव कारखाना आहे. शुद्धता हे येथील वैशिष्ट्य आहे. लंडनमधील बुलियन मार्केट असोसिएशन (एबीएम)सह जागतिक स्तरावरील शुद्धतेसाठीची प्रशस्तिपत्रके या कारखान्याकडे आहेत.


  - कच्च्या मालापासून ८० टक्के सोन्याची निर्मिती : सोने सुमारे ११०० अंश सेल्सियस तापमानावर वितळते. नंतर अत्याधुनिक तंत्राने त्याचे शुद्धीकरण होते. जगातील विविध खाणींतून येथे सोने येते. कच्च्या मालापासून ४० ते ८० टक्के सोने काढले जाते. कारखान्यात ६०० कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना काम देण्यापूर्वी १५ दिवस ते एक महिना प्रशिक्षण दिले जाते. कारखान्यातील तापमान सहन करण्याजोगे खास प्रकारचे कपडे कर्मचाऱ्यांना दिले जातात.


  - फॉर्च्यून ५०० मध्ये भारतातील सर्वोच्च सात कंपन्यांमध्ये राजेश एक्सपोर्टला स्थान मिळाले आहे. मेहता सांगतात, सोने शुद्धीकरणापासून ग्राहकांसाठी दागिने तयार करण्याची प्रक्रिया होणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.


  या कंपनीच्या दागिन्यांमध्ये टाके न घालता लेझरद्वारे जोडकाम केले जाते. या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे २.४० लाख कोटी रुपये आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनुसार, कंपनीचे बाजार भांडवल सुमारे १६,८५१ कोटी रुपये आहे.

  - धर्मेंद्रसिंह भदौरिया

Trending