आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 हजार मुलांची निदर्शने, म्हणाले, आकाश निळे असावे वाटते की रक्ताळलेले? 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रसेल्स- बेल्जियममध्ये गुरुवारी पर्यावरण सुरक्षा मजबूत करण्यासाठी देशभरातील तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. पर्यावरण संरक्षणासंदर्भात घोषणा फलकावर लिहिलेल्या होत्या. आकाश निळे राहावे असे वाटते की त्यातून रक्त टपकणारे दिसावे? असा प्रश्न त्यावर लिहिलेला होता. एका विद्यार्थ्याने लिहिले, अन्य बी विश्व नाही, आपल्याला येथेच राहायचे आहे. 

 

पोलिसांनी सांगितले, देशभरातील ३५ हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरणासाठी निदर्शने केली. यात राजधानी ब्रसेल्समध्ये सुमारे साडेबारा हजार व लिएझ शहरात १५ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. बेल्जियममध्ये यूथ फॉर क्लायमेट संघटनेने गेल्या चार आठवड्यापासून निदर्शने सुरू केली आहेत. सरकार जोपर्यंत पर्यावरण संरक्षणासाठी काही निर्णय घेत नाही, तोपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार आहेत. बेल्जियममध्ये शाळा अनिवार्य आहे. तथापि त्यांनी पालकांची परवानगी घेतली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...