आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 37 Thousand Crore Loss To Eight Companies In Our Daily Work In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपल्या रोजच्या कामातील आठ कंपन्यांना 37 हजार कोटींचा तोटा

एका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : जर तुम्ही झोमॅटोकडून जेवण मागवले, आॅफिससाठी ओला कॅब केली, व्यवहार पेटीएमने केले, मेकमाय ट्रिपवर सुट्या प्लॅन करत आहात, हाॅटेल ओयोवर सर्च करत असाल, चित्रपट पाहण्यासाठी बुक मायशोद्वारे तिकीट घेत असाल, बिग बास्केटद्वारे किराणा आॅर्डर करत असाल आणि सोबतच आॅनलाइन शाॅपिंगसाठी कपडे फ्लिपकार्टद्वारे खरेदी करत असाल, तर अशा प्रकारे तुम्ही दिवसभरात ८ आॅनलाइन कंपन्यांची सेवा घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे वेगाने वाढत असलेल्या या ८ आॅनलाइन कंपन्यांचा सामूहिक तोटा सध्या ३६ हजार ७६१ रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे या कंपन्या देशात सुमारे २०-४० टक्के या वार्षिक दराने आपला व्यवसाय आणि ब्रँड व्हॅल्यूही वाढवत आहेत. दरवर्षी या कंपन्या ग्राहक संख्या आणि महसूल वाढवत आहेत तसेच नवी गुंतवणूकही मिळवत आहेत. दुसरीकडे त्याचा तोटाही वाढत आहे. एका उदाहरणावरून ते समजून घेऊ शकतो. आॅनलाइन जेवण पुरवणाऱ्या झोमॅटोचा २०१४-१५ मध्ये महसूल ३६.१२ कोटी रुपये होता. त्या वर्षी कंपनीचा तोटा ३७.१७ कोटी रुपये होता. पाच वर्षांत कंपनीचा महसूल सुमारे ३७ पट वाढून १,३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला, पण तोटा ५७० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला. तज्ञांच्या मते किमान पुढील पाच वर्षांपर्यंत देशात आॅनलाइन कंपन्यांच्या व्यवसाय तोट्यातच चालेल. पीडब्ल्यूसीचे पार्टनर आणि डील स्ट्रॅटेजीचे लीडर संकल्प भट्टाचार्य यांनी सांगितले की, आॅनलाइन कंपन्यांच्या प्लॅटफाॅर्म्सवर आक्रमकपणे डिस्काउंट चालतो सोबतच डिलिव्हरी, वेअर हाउसिंग आणि व्यवसायाचा विस्तार केल्यानंतर सतत गुंतवणूकही होत आहे. पण, सध्या या कंपन्या नफा मिळवू शकत नाहीत. कंपन्यांचा प्रयत्न ग्राहकांच्या व्यवहारात बदल आणून त्याला आपल्या ब्रँडशी जोडून ठेवणे हा आहे. मग तोटा सतत वाढत असतानाही कंपन्या व्यवसाय का वाढवत आहेत, या प्रश्नावर ई-काॅमर्स कंपन्यांना सल्ला देणाऱ्या टेक्नोपॅक कन्सल्टिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अंकुर बिसेन म्हणाले की, पायाभूत आॅफलाइनची कमतरता पूर्ण करण्यास आपण सक्षम आहोत असे आॅनलाइन बाजाराला वाटले. त्यासाठी ओयो, पेटीएम यांसारख्या कंपन्यांनी एक नवी सुरुवात देशात केली. आॅनलाइन कंपन्यांनी प्रथमच देशात वस्तूंचे नवे दर निश्चित (प्राइस डिस्कव्हरी) केले. कंपन्यांनी मोठा डिस्काउंट देऊन ग्राहकांना आकर्षित केले.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपन्यांना पैसा हवा आणि ही कमतरता व्हेंचर इनव्हेस्टमेंट फंडाद्वारे पूर्ण झाली. त्यात मोठा हिस्सा विदेशी कंपन्यांचा राहिला आहे. ही संकल्पना अमेरिका, युरोप, चीनमार्गे भारतात आली आहे. एका स्थितीनंतर कंपन्यांसाठी तोट्याला फार महत्त्व राहत नाही. एक निश्चित धारणा किंवा अपेक्षेच्या आधारावर देशात व्यवसाय होत आहे.

व्यवसायाचा विस्तार केल्यानंतर सतत गुंतवणूकही होत आहे. पण, सध्या या कंपन्या नफा मिळवू शकत नाहीत. कंपन्यांचा प्रयत्न ग्राहकांच्या व्यवहारात बदल आणून त्याला आपल्या ब्रँडशी जोडून ठेवणे हा आहे. मग तोटा सतत वाढत असतानाही कंपन्या व्यवसाय का वाढवत आहेत, या प्रश्नावर ई-काॅमर्स कंपन्यांना सल्ला देणाऱ्या टेक्नोपॅक कन्सल्टिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अंकुर बिसेन म्हणाले की, पायाभूत आॅफलाइनची कमतरता पूर्ण करण्यास आपण सक्षम आहोत असे आॅनलाइन बाजाराला वाटले. त्यासाठी ओयो, पेटीएम यांसारख्या कंपन्यांनी एक नवी सुरुवात देशात केली. आॅनलाइन कंपन्यांनी प्रथमच देशात वस्तूंचे नवे दर निश्चित (प्राइस डिस्कव्हरी) केले. कंपन्यांनी मोठा डिस्काउंट देऊन ग्राहकांना आकर्षित केले.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपन्यांना पैसा हवा आणि ही कमतरता व्हेंचर इनव्हेस्टमेंट फंडाद्वारे पूर्ण झाली. त्यात मोठा हिस्सा विदेशी कंपन्यांचा राहिला आहे. ही संकल्पना अमेरिका, युरोप, चीनमार्गे भारतात आली आहे. एका स्थितीनंतर कंपन्यांसाठी तोट्याला फार महत्त्व राहत नाही. एक निश्चित धारणा किंवा अपेक्षेच्या आधारावर देशात व्यवसाय होत आहे.

नोट : आर्थिक आकडे कोटी रुपयांत. *पेटीएमला १३-१४ मध्ये नफा झाला. स्रोत- काॅर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार. कंपन्यांचा तोटा करोत्तर आहे. कंपन्यांचे आकडे स्टँड अलोन घेतले आहेत, तिच्याशी संबंधित ग्रुपच्या इतर कंपन्यांसाठी नाहीत. बिग बास्केटच्या दोन कंपन्या आहेत. आम्ही ठोक काम करणारी कंपनी सुपरमार्केट ग्रोसरी सप्लाइजचे आकडे समाविष्ट केले नाहीत. फ्लिपकार्टच्या आकड्यात दोन कंपन्यांचे (फ्लिपकार्ट इंडिया प्रा. लि. आणि फ्लिपकार्ट इंटरनेट प्रा. लि.) आर्थिक आकडे समाविष्ट आहेत. मेक माय ट्रिपच्या आकड्यांत आम्ही फक्त मेक माय ट्रिप (इंडिया) प्रा. लि.चेच आकडे घेतले आहेत. आयबिबो आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवसायाचे आकडे समाविष्ट केले नाहीत.

कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये आश्चर्यकारक गोष्टी... 

जी सर्वात तोट्यात - ओयो - ४ वर्षांत १३६६ पट तोटा


वर्ष २०१३-१४ मध्ये ओयोला फक्त ८४ लाख रु.चा एकूण तोटा झाला होता. २०१७-१८ मध्ये एकूण तोटा वाढून १३६६ पट म्हणजे ११४८.२२ कोटी झाला. ओयो भारत, नेपाळ, मलेशिया, चीन, इंडोनेशिया, यूएईत ८०० शहरांत आहे. २३ हजारांपेक्षा जास्त हाॅटेलशी करार आहे.

मेक माय ट्रिप - ११ पटी पेक्षा जास्त वाढला तोटा


कंपनीची उधारी फक्त चार वर्षांदरम्यान (आर्थिक वर्ष २०१३-१४ ते २०१७-१८) सुमारे ९८ लाखांवरून वाढून २.७५ कोटी रुपये झाली. यादरम्यान कंपनीचा एकूण तोट्यात सुमारे ११ पटींपेक्षा जास्त वाढ झालेली आहे.

बुक माय शो - तोटा ४ कोटींवरून १४० कोटी रुपयांचा झाला


कंपनीला २०१३-१४ मध्ये ४.०३ कोटी रु.चा तोटा झाला होता, तर २०१७-१८ दरम्यान १४०.२६ कोटी रुपये झाला. कंपनीनुसार १.५ कोटी तिकिटे कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून दरमहा बुक होतात.

पेटीएम - आधी फायदा, आता कंपनी तोट्यात


आपल्या स्थापनेपासून आर्थिक वर्ष २०१३-१४ पर्यंत पेटीएम एकूण जवळपास १५० कोटी रु.च्या फायद्यात होती. पण, २०१७-१८ या वर्षामध्ये कंपनीला एकूण सुमारे ४,१०२ कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे.

बिग बास्केट - प्रमोशनवर पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला


वर्ष २०१७-१८ दरम्यान ५.५५ कोटी प्रमोशनवर (प्रचार-प्रसार) खर्च केले. कंपनीचा महसूल २०१७-१८ दरम्यान सुमारे १४१० कोटी रु. होता. २०१३-१४ मध्ये २.३५ कोटी रु. तोटा झाला, वर्ष २०१७-१८ मध्ये १७९.२३ कोटी झाला.

झोमॅटो - कंपनीजवळ ३२०८ कोटी राखीव


सध्या २४ देशांतील १० हजारांपेक्षा जास्त शहरांत उपस्थिती. दरमहा १० कोटी लोकांना जेवणाची ऑर्डर पोहोचवणारी कंपनी झोमॅटोकडे २०१८-१९ पर्यंत एकूण राखीव ३,२०८ कोटी रुपयांपर्यंत होते.

यात सर्वात चांगली : फ्लिपकार्ट - ४ वर्षांत महसुलात तिप्पट वाढ


फ्लिपकार्ट इंडिया प्रा. लि. आणि फ्लिपकार्ट इंटरनेट प्रा. लि.चा संयुक्त महसूल २०१४-१५ मध्ये १०,३०९.२४ कोटी रु. होता. २०१८-१९ मध्ये तो वाढून ३५,७३४.९ कोटी रु. झाला. यादरम्यान फ्लिपकार्ट इंटरनेटने २०१८-१९ मध्ये प्रमोशनवर ११४१ कोटी रुपये खर्च केले.

तोट्यात, पण उधार नाही : ओला - महसूल ३६, तोटा १९३ पट वाढला


१५ लाख कॅब (ड्रायव्हर पार्टनर) असलेल्या ओला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीवर उधारी नाही. कंपनीचा महसूल २०१३-१४ मध्ये फक्त ५१.०५ कोटी रु. होता, तो २०१७-१८ मध्ये वाढून १८६०.६१ कोटी रु. झाला. म्हणजे ३६ पटीपेक्षा जास्त वाढ.