आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत ३७ टन सोन्याची नाणी, दागिन्यांची होणार विक्री, या आठवड्यात पुष्य नक्षत्र आणि दीपावली असल्याने व्यवसाय वाढेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मेंद्रसिंह भदौरिया 

नवी दिल्ली - गाझियाबादच्या इंद्रापुरममध्ये राहणाऱ्या वंदना सिंग दिवाळी साजरी करण्यासाठी प्रयागराजला सासुरवाडीत जातील. याआधी त्यांनी नोएडातील मॉलमध्ये दिवाळीची खरेदी केली. यात डिझायनर कुर्ते, डिझायनर दिवे, रोषणाईचे साहित्य, कुटुुंबीयांसाठी कपडे, बूट खरेदी केले. त्या सांगतात की, या वेळी दिवाळीत मिठाई, फटाके व प्रवासावर सुमारे २०-२२ हजार खर्च होतील. देशातील कोट्यवधी कुटुंब या वेळी सणाच्या तयारीत व्यग्र आहेत. दिवाळीत दागिने, कपडे, रोषणाईचे साहित्य, मिठाई, फटाके, गिफ्ट, वाहने इतर सर्व क्षेत्रांतील मागणी वाढली आहे. कॉन्फेडरेशन आॅफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे महासचिव प्रवीण खंडेलवाल सांगतात की, देशात वर्षभरात सुमारे ४५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत २० दिवसांत पाच ते सहा लाख कोटींचा व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. ते सांगतात की, आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत व्यवसायात मंदी आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून दिवाळीच्या खरेदीला वेग येईल. चांगला व्यवसाय होण्याची आशा आहे. २१-२२ रोजी पुष्य नक्षत्र असल्याने व नंतर दिवाळीची खरेदी सुरू होणार असल्याने व्यावसायिक पुढील आठवड्याबाबत उत्साहित आहेत. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष अक्षय शहा यांनी सांगितले की, नवीन घरे घेण्याबाबतच्या चौकशीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. 
 

सणातील पाच प्रमुख गोष्टींतून समजून घेऊ कशी राहणार यंदाची दिवाळी
 

सोने : ७ ते ९ टन नाणी, ३० टन  दागिने विक्रीचा अंदा
जगातील सर्वात मोठ्या राजेश एक्स्पोर्ट॰सचे एमडी राजेश मेहता सांगतात की, सोने महाग झाल्याने व अर्थव्यवस्थेत मंदी असूनही देशात दिवाळीत सुमारे सात ते नऊ टन सोन्याची नाणी व ३ ० टन दागिने विक्री होण्याचा अंदाज आहे. सर्वात जास्त नाण्यांची विक्री धनत्रयोदशीला तर दागिन्यांची खरेदी दिवाळीच्या दिवशी होते. तर वर्ल्ड गोल्ड काैन्सिलचे एमडी पी. आर. सोमसुंदर यांनी सांगितले की, दागिन्यांच्या तुलनेत लोक सोन्याची नाणी खरेदीला प्राधान्य देत आहेत. सोन्याच्या नाण्यांची सर्वाधिक विक्री पुष्य नक्षत्र व धनत्रयोदशीला होते. लक्झरी ज्वेलरीत कोणताही बदल नाही. अंगठी, कानातील दागिने, मंगळसूत्र आदी कमी वजनाच्या दागिन्यांची मागणी सर्वाधिक आहे.
 

कपडे : ३० ते ४० टक्के ब्रँडेड कपड्यांची विक्री
क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या विक्री कमी आहे. दिवाळीचा बोनस मिळाल्यानंतर दिवाळीच्या खरेदीला सुरुवात होईल. मेहता यांनी सांगितले की, एकूण कापड विक्रीत ९० टक्के रेडिमेड कपड्यांची विक्री होते. यात ३० ते ४० टक्के ब्रँडेड कपड्यांची विक्री होते. उर्वरित इतर कपड्यांची. मेहता यांच्या मते देशात सुमारे सहा ते साडेसहा लाख कोटी रुपयांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. आॅनलाइनवर मोठ्या सवलती असूनही दिवाळीत १२ ते १४ टक्के विक्री होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे सुमारे ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तची विक्री होऊ शकते. दिवाळीत पारंपरिक वस्त्रांची मागणी वाढते.
 

मिठाई : सणांदरम्यान मिठाईची मागणी यावेळी २० ते  ३० टक्के जास्
बिकानो या प्रसिद्ध नावाने मिठाई-नमकीन विकणारी कंपनी बिकानेरवाला फूड्सचे एमडी श्याम सुंदर अग्रवाल यांच्या मते, दिवाळीला पूजेसाठी मिठाईचाच वापर केला जातो. लक्ष्मीपूजन चॉकलेटने होत नाही. काजूबर्फी, बेसनबर्फी, गुलाब जामून, रसगुल्ला, लाडू इत्यादी मिठाईंची मागणी जास्त असते. एसोचॅमच्या माहितीनुसार २०१७ पर्यंत देशभरात मिठाईंनी ६५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला आहे. आणि देशात मिठाईचा व्यवसाय १० ते १२ टक्के वेगाने वाढत आहे. 
 

फटाके : कमी आवाज करणाऱ्या व पर्यावरणपूरक फटाक्यांची मागणी
ऑल इंडिया फायरवर्क्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि देशातील फटाक्यांचे केंद्र असलेल्या शिवकाशीचे व्यापारी तमिल सेलवन सांगतात की, सरकार आणि कोर्टाच्या निर्बंधांमुळे कमी आवाज करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक फटाक्यांची मागणी वाढलेली आहे. उत्पादकांनी केलेल्या मागणीच्या तुलनेने हे कमी बनवले जात आहेत. हे महाग असल्यामुळे आणि जास्त दिवस न टिकणारे असल्याने दिवाळीसाठी इथे जानेवारीपासूनच फटाके तयार करण्यास सुरुवात होते.
 

राेषणाई : एलईडी माळा, दिवे, मूर्तींची मागणी
देशातील मोठ्या रोषणाई बाजार भागीरथ पॅलेस बाजारात देशभरातून लायटिंगची मागणी नोंदवली जाते. दिल्ली इलेक्ट्रिकल्स ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष भरत आहुजा यांनी सांगितले की, दिवाळीत दिव्यांची माळ, दिवे, बल्ब, एलईडी, देवाच्या मूर्ती आदी लायटिंगच्या साहित्याची मागणी मोठी असते. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी काहीसा बदल असा आहे की, चीनच्या आयातीवर अवलंबून असलेल्या या बाजारात भारतीय लायटिंग वाढली आहे. प्रमाण १० ते १५ टक्के झाले आहे. अाहुजा सांगतात की, बिहारमध्ये पुरामुळे व काश्मीरमध्ये विक्री जास्त झाली नाही. प्रवीणकुमार राणा सांगतात की, ३५ मीटर माळेची किंमत २०० ते २२० रु., २५ मीटरच्या एलईडी माळेची किंमत ६०० ते ९०० रु. आहे. लायटिंगचा दिवा ८० रुपये व लायटिंगच्या मूर्ती ६०० ते ९०० रुपयांपर्यंत आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त माळा, एलईडी माळा, दीपक, बल्ब, मूर्ती चीनमधून आयात हाेतात.