आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3,86,000 Children Were Born Worldwide On 1 January, India Rank First, The Very First Baby In The World Born In Fiji

एक जानेवारीला संपूर्ण जगात जन्मली 3,86,000 मुले, भारत अग्रस्थानी, फिजीमध्ये जन्मले जगातील सर्वात पहिले बाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूनिसेफ या संस्थेच्या रिपोर्टनुसार, 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारीला 386,000 बाळांचा जन्म झाला. यामध्ये भारत अग्रस्थानी आहे. भारतात या दिवशी 69,000 मुले जन्माला आली. यानंतर चीनचा क्रमांक लागला आहे. चीनमध्ये एकूण 44,760 बाळांचा जन्म झाला. यूनिसेफच्या आकडेवारीनुसार, मुलांचा जन्मदर असा आहे....  भारतात - 69,000  चीन - 44,760 नायझेरिया - 20,210  पाकिस्तान - 14,910 इंडोनेशिया - 13,370 संयुक्त राष्ट्र अमेरिका - 11,280 कांगो - 9,400 इथोपिया - 9,020  बांग्लादेश - 8,370  यूनिसेफने त्या बाळाबद्दलही माहिती दिली जे नव्या वर्षात सर्वात आधी जन्माले आहे. हे बाळ फिजी येथील आहे. त्याचा जन्म (12.10) बारा वाजून दहा मिनिटांनी झाला. भारताबद्दल यूनिसेफने सांगितले, येथे 69 हजार मुले दार दिवशी जन्म घेतात. जन्माचा पहिला दिवस आई आणि बाळासाठी महत्वाचा आणि काळजीचा असतो. कारण याचदिवशी अर्ध्या अधिक मृत्यूची नोंद होते. तर 40 टक्के बाळांचा मृत्यू जन्माच्या दिवशीच होतो. भारतात दरवर्षी सुमारे 50 लाख मुलांचा जन्म घरातच होतो. मुलांमृत्यू रोखण्यासाठी आईची तब्येत स्वस्थ असणे आणि तिला सर्व सुविधा मिळणे गरजेचे आहे.