आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहेंग्यात अतिशय आकर्षक दिसली 39 वर्षीय करीना कपूर, बघा दिलखेचक अदा  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री करीना कपूर सध्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे आहे. अलीकडेच येथे तिच्या हस्ते पुरुष आणि महिला टी-20 विश्वकप चषकांचे अनावरण करण्यात आले. आयसीसी पुरुष टी-20 विश्वकप स्पर्धा पुढील वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर महिला टी-20 विश्वकप स्पर्धाही पुढील वर्षी 21 फेब्रुवारीपासून ते 8 मार्चपर्यंत होणार आहे.  बॉलिवूडची फॅशनिस्टा असलेल्या करीनाने अलीकडेच येथील तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे.  या छायाचित्रांमध्ये तिचा देसी अवतार बघायला मिळतोय. डिझायनर नरजिसने डिझाइन केलेल्या लहेंग्यात करीना अतिशय सुंदर दिसतेय. 

पिंक कलरच्या वी-नेकलाइन ब्लाउजसोबत मॅचिंग चिकनकारी लहेंगा तिने परिधान केला आहे.  सिंपल मेकअप, आय मेकअप, पिंक लिप ग्लॉस आणि झुमक्यांनी तिच्या लूकला चारचाँद लावले आहेत. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये करीना लक्ष वेधून घेतेय. 

करीनाच्या वर्कफ्रंटविषयी सांगयचे म्हणजे, अलीकडेच तिने 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रपटात ती अभिनेता इरफान खान आणि राधिका मदनसोबत झळकणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज', करण जोहरच्या मल्टी स्टारर 'तख्त' आणि आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'मध्ये झळकणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...