आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काहिरा- इजिप्तची राजधानी काहिराजवळ जगातील सर्वात मोठी रहिवासी कॉलनी बनत आहे. या कॉलनीतील 13500 अपार्टमेंट्समध्ये 30 हजारांपेक्षा जास्त लोक राहू शकतील. याला बनवण्यासाठी अंदाजे 3 हजार 873 कोटी रुपये (420 मिलीयन पाउंड्स) लागणार आहेत. यात शॉपिंग मॉल, सिनेमा आणि इतर लग्झरी सुविधादेखील मिळतील.
विशाल स्कायलाइन इमारतीला जॉर्डियन-अमेरिकन रियल एस्टेट डेव्हलपर आणि डिझायनर मोहम्मद हदीद डिझाइन करत आहे. या इमारतील 'फ्लॅट्स ऑफ ब्लॉक' नाव दिले आहे. याला बनवणाऱ्यांनी तर्क लावला आहे की, काहिराची लोकसंख्या 210 लाख आहे आणि आगामी एका वर्षात 5 लाखांनी वाढेल. यामुळे हजारो घरांची गरज पडणार आहे. या गरजेला पाहता हा प्रोजेक्ट सुरू झाला आहे. या डेव्हलपर्सचा दावा आहे की, ही जगातील सर्वात मोठी रहिवासी कॉलनी असेल. या कॉलनीला 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे.
स्कायलाइन कॉलनीसाठी 13500 अपार्टमेंट्समधील फ्लॅट्सच्या किमती 35 लाख
रुपयांपासून 87 लाख रुपयांत्या मध्ये असेल. येथील रहिवाशांना 40 एकरांचे गार्डन, सायकिल ट्रॅक आणि स्वीमिंग पूल इत्यादी सुविधा मिळतील. याशिवाय, फिटनेस सेंटर, रॉक क्लायबिंग वॉल आणि रेस्टारेंटदेखील असतील. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सने सर्वात मोठी रहिवासी कॉलनी बनत असल्याची घोषणा केली आहे. पण, या कॅटेगरीत आतापर्यंत कोणताच रेकॉर्ड नाहीये. सध्या जगातील सर्वात टॉलेस्ट रेसिडेंशियल ब्लॉक 432 पार्क अेॅव्हेन्यू न्यूयॉर्क मध्ये आहे. याची लांबी 426 मीटर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.