आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 3rd Slandered Student Behave Like 3 Idiots Character Phungsuk Wangadu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे इंदूरचा \'फुंग सुक वांगडू\', कमी वयात देतो 10 वीच्या मुलांना टक्कर; याचे टॅलेंट पाहून मोठमोठे लोक झाले हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मंदसौर (इंदूर) : आमिर खानच्या 3 इडियट्स या चित्रपटातील 'काबिल बनो काबिल, कामयाबी खुद पीछे आएगी.' हा संवाद तिसरीत शिकणाऱ्या एका मुलावर लागू होतो. त्याने नुकतेच 1 ली के 10 पर्यंतचे गणिताचे सर्व प्रश्न सोडविले आहेते. तसेच 10 वीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे उदारहण सोडविण्यासाठी हा मुलगा मदत करत असतो. त्याने हे सर्व चित्रपटातील पात्र फुंग सुक वांगड़ू प्रमाणे वेगवेगळ्या वर्गात बसून शिकला आहे. यामुळे शिक्षक देखील आश्चर्यचकित झाले आहेत. 

 

भानपुरा येथील 8 वर्षीय विद्य़ार्थी मुजम्मिल युसूफ पठाण ब्राइट स्टार पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकतो. एका महिन्याच्या मेहनतीनंतर एका ड्रॉइंग शीटवर इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे 3500 प्रश्न सोडविले आहे. कमला सकलेचा शाळेत झालेल्या एका आयोजनात याचे प्रदर्शन करून मुजम्मिलने सर्वांना चकित केले आहे. मुजम्मिलच्या वडिलांना सांगितले की, मुलाला गणित विषयात सुरुवातीपासूनच आवड आहे. त्याने याआधी सुद्धा अनेकवेळा उदारहणे सोडवून आम्हाला चकित केले आहे. 


कौतुकास्पद आहे मुजम्मिलने बनवलेली ड्रॉइंगशीट

शिक्षक सौरभ जैननुसार, मुजम्मिलला गणित विषयाच खूपच रस आहे. तो आपल्या गणिताची उदाहरणे सोडविल्यानंतर अन्य वर्गातील विद्यार्थ्यांचे गणित सोडवून शिकत आहे. त्याने तयार केलेली ड्रॉइंगशीट खरंच कौतुकास्पद आहे. 


छोट्या मुलाने 10 वीचे प्रश्न सोडविणे हैराण करणारे

इतर मुले गणितापासून दूर पळतात. त्यांना गणित विषयाची भीती वाटते. पण या लहान मुलाने दहावीपर्यंतचे प्रश्न सोडविणे हैराण करणारे आहे. मी माझ्या संपू्र्ण आयुष्यात असा विद्यार्थी पाहिले नसल्याचे उत्कृष्ट विद्यालयाचे प्राचार्य पृथ्वीराज परमार यांनी सांगितले. 

 

एखाद्याने मुलाने रूजी घेतल्यास हे शक्य आहे. 
मुजम्मिल एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. यापूर्वी कोणत्याच मुलाबद्दल असे ऐकले आणि पाहिले नाही. एखादा मुलगा जर गणित किंवा इतर विषयात रूची घेत असेल तर असे होणे शक्य असल्याचे पीजी कॉलेजचे प्राध्यापक डॉ.टी.के. झाला यांनी सांगितले.