Akshaya Tritiya / अक्षय्य्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यामागे 4 मान्यता आणि फायदे

अक्षय्य तृतीया तिथीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. कारण हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे...

रिलिजन डेस्क

Apr 30,2019 12:05:00 AM IST

मंगलकार्य आणि शुभ खरेदीसाठी अक्षय्य तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेस 7 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया तिथीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अक्षय्य तृतीयेचा सार्वभौमिक अकालनीय मुहूर्तांच्या तिथीमध्ये समावेश होतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यामागील चार मान्यता आणि फायदे.


- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. ज्योतिषांच्या ग्रह-नक्षत्राच्या भाषेत हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते.


- मान्यतेनुसार, या दिवशी सोन्याच्या रूपात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आपल्या घरात सदैव वास्तव्य राहते.


- याव्यतिरिक्त सोन्याची तुलना सूर्यासोबत केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुर्यदेवाचे तेज सर्वात जास्त असते. सोने खरेदी करणे शक्तीचे प्रतीक मानले जाते.

- सोने नेहमीच मौल्यवान धातू आणि धन-समृद्धिचे प्रतीक समजले जाते. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

X
COMMENT