आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदिवलीत जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू, आग विझल्यानंतर सापडल्या डेडबॉडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कांदिवली (पूर्व) मधील दामू नगरात रविवारी (ता.23) जीन्स फॅक्टरीमध्ये लागलेल्या भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सर्च ऑपरशनमध्ये एका खोलीत अग्निशमन दलाच्या जवानांना चार मृतदेह आढळून आले. राजू विश्वकर्मा (30), राजेश विश्वकर्मा (36), भावेश पारेख (51), सुदामा लल्लन सिंह (36) अशी मृतांचे नावे आहेत.

 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांदिवलीमधील एमआयडीसी बस स्टॉपजवळ एका जीन्स फॅक्टरीला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली होती. आगीत फॅक्टरीतील माल जळून खाक झाला. अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. रात्री उशीरा अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

 

सर्च ऑपरेशनमध्ये सापडले चार मृतदेह
आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर कूलिंगचे काम चालले. सोमवारी सकाळी फॅक्टरीत सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. दरम्यान, एका खोलीत 4 मृतदेह आढळून आले. फॅक्टरीत आग लागली तेव्हा काही कामगार काम करत होते. आगीच्या भीतीने चार जण एका खोलीत गेले. परंतु आग आणखी भडकल्याने त्यांना खोलीतून बाहेर निघता आले नाही. त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...