आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार, गोदिंयाच्या देवरी येथे भीषण अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यात शनिवारी पहाटे घडला. 

 

नागपूरहून रायपूरच्या दिशेने तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यात तीन क्लिनर आणि एक चालक जागीच ठार झाले. दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी केवळ दोघांची ओळख पटली असून त्यात ट्रकचालक रवी यादव (३०, माहूरकला राजदगाव), तर क्लिनर जावेद हाला (वय २८, गुजरात) या दोघांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...