आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघातात 4 ठार, 5 गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आडोशी बोगद्याजवळ झालेल्या या अपघातात ट्रक आणि कार यांची धडक झाली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

खोपोली येथील ओडिशी बोगद्याजवळ मुंबईहून पुण्याचा दिशेने येणारा ट्रक लेन सोडून वेगात दुसऱ्या लेनवर गेला. त्याचवेळी पुण्यावरून मुंबईला जात असलेल्या दोन कारला हा ट्रक धडकला. या भीषण अपघातात दोन्ही कारला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.