Home | National | Madhya Pradesh | 4 dies as Car Swept Away in Flood in Mandsaur

थोड्या घाईमुळे गेला चौघांचा जीव; लोकांनी अडवले तरी पुढे नेली कार, वाहून गेल्याने 4 जण बुडून ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 01:52 PM IST

गावकऱ्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर दोरीने ओढून आतील लोकांना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. त्याठिकाणी सर्वांन

  • मंदसौर - धमनार-बडवन रस्त्यावरूल पुलावरून वाहून गेल्याने एक कार मंगळवारी नाल्यात पडली. या अपघातात चार जणांचा बुडून मृत्यू झाला. पुलावर पाणी असल्याने एका गावकऱ्याने कारला अडवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाही. त्यामुळे कार पुलाच्या मध्यभागी गेली तेव्हा पाण्याच्या वेगाने वाहून गेली आणि नाल्यात पडली. गावकरी पोहोचण्याआधीच जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कार वाहून गेली. गावकऱ्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर दोरीने ओढून आतील लोकांना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. त्याठिकाणी सर्वांना मृत घोषित करण्यात आले.

    जेके सीमेंटचे डिस्ट्रीब्यूटर 60 वर्षीय अरविंद राजमल नागौरी आणि त्यांच्याबरोबर 35 वर्षीय दीपक अग्रवाल, 30 वर्षीय राहुल माहेश्वरी आणि ड्रायव्हर 50 वर्षीय नवरत्न गोयल हे कारने दलौदाला गेले होते. त्याठिकाणी काम उरकून ते दुपारी 2 वाजता धमनारला पोहोचले. त्याठिकाणाहून ते दुपारी 3 वाजता बडवनकडे निघाले. दो किमी अंतरावर मडियाखाल नाल्याने पाणी पुलावरून वाहत होते. त्याठिकाणी उभे असलेले शेतकरी गोपाल लोकांना पुढे न जाण्याचा इशारा देत होते. पण नागौरी यांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत गाडी पुलावरून पुढे घेतली.

    तेवढ्यात झाला अपघात..
    ड्रायव्हरने कार पुलावर चढवताच कार नाल्यात पडली. गावकरी पोहोचले तोपर्यंत कार जवळपास एक किमीपर्यंत वाहून गेली होती. सर्वांनी आसपासच्या गावात याबाबत माहिती दिली आणि कार शोधण्याचा प्रयत्न केला. कार दिसली तेव्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने तासाभराने त्या सर्वांना दोरीच्या सहाय्याने ओढून बाहेर काढले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

  • 4 dies as Car Swept Away in Flood in Mandsaur
  • 4 dies as Car Swept Away in Flood in Mandsaur

Trending