Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | 4 family member dies in accident in Ahmednagar

एकाच कुटुंबाताली चैघांवर काळाचा घाला, अहमदनगरमधील अपघातात चार जणांचा मृत्यू, तर चार जण जखमी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 02:29 PM IST

अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला

  • 4 family member dies in accident in Ahmednagar

    अहमदनगर- अहमदनगर-जामखेड मार्गावर भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालय तर चार जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज(रविवार) सकाळी 6 वाजता झाला असून, पोलिसांनी जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे.

    जामखेडजवळील पोखरी फाट्यावर ट्रक आणि अट्रीगा कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 पुरूष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेळ आहे. नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे आणि अनिकेत चमकुरे(7) अशी मृतांची नावे आहेत.

    हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते नांदेडवरून गुजरातला जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हरने तेथून पळ काढला. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Trending