आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजींचे 4 ऐतिहासिक भाषणे: आम्हाला अचानक एवढी मते पडली नाहीत, हे कष्‍टाचे फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१३ दिवसांचे सरकार पडल्यावर...
आम्हाला एवढी मते पडली हा काही चमत्कार नाही. आमच्या ४० वर्षांच्या कष्टाचे हे फळ आहे. आम्ही आणखी थोड्या जागा मिळवू शकलो नाहीत म्हणून आम्हाला घेरले जात आहे. परंतु, आम्ही आता सभागृहात सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून बसू. आमचे सहकार्य घेऊनच तुम्हाला कामकाज करावे लागेल. आम्ही संपूर्ण सहकार्य देऊ, निश्चिंत राहा.

 

लोकपाल विधेयकावर...
वर्षानुवर्षे लोकपाल विधेयक धूळ खात पडले आहे. पंतप्रधानांबद्दल कुणाची तक्रार असेल तर त्यांनी जायचे कुठे? पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत असावेत की नाहीत, यावर वर्षानुवर्षे चर्चा होत राहिली. मी सहमती दर्शवली. विधेयक कुठे आहे, म्हणून विचारले. सभागृहाची कारवाई संपल्यावर इतर विषयांवर अध्यादेश काढण्यास सरकार तयार झाले. मग, यावर अध्यादेश का नाही? संसदेने आपले काम केले नाही, प्रकरणे लटकावून ठेवली आणि पंतप्रधानांकडे निर्णय का होत नाही म्हणून विचारणा केली तर त्याचे उत्तर असेल, निर्णय न घेणे हा पण निर्णयच आहे.

 

अमेरिकी काँग्रेसच्या अधिवेशनात
आपण स्पष्टवक्तेपणाने बोलतो तेव्हा लोकशाहीत दहशतवादाविरुद्ध लढाई, ऊर्जा, पर्यावरण, विज्ञान-तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात अनेक नव्या शक्यतेची द्वारे उघडली जातात. भारत-अमेरिकेने भूतकाळ विसरून आधुनिक युगात निर्णायक पाऊल उचलले आहे. नव्या शताब्दीत या दोन देशांतील संबंधांत नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. चला, एकत्र येऊन आपण काही वर्षांपासून आपसांत असलेल्या अस्वस्थतेच्या सावल्या आता मिटवूयात. आपल्यामध्ये अलेल्याा या महान शक्तीचा वापर आपण आपल्यासोबत संपूर्ण जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करूयात.

 

पोखरण चाचणीनंतर...
आपल्यावर तीन वेळा हल्ले झाले. आता पुन्हा असे हल्ले व्हायला नकोत. आमची तशी इच्छा नाही, पण कुणावरही हल्ला करण्यास आम्ही सज्ज आहोत. पोखरण-२ आणि लाहोर बस सेवेबद्दल मला विचारणा झाली. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. आमची संरक्षण शक्ती आणि मैत्रीसाठी आमचा प्रामाणिक हात.

बातम्या आणखी आहेत...