आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार छत्रपती खून प्रकरणात राम रहीमसह 4 जण दोषी, 17 तारखेला सुनावली जाणार शिक्षा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालण्यात आल्या होत्या त्याचा परवाना डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर कृष्ण लालच्या नावले होता
  • साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. 

पंचकुला/पानिपत - सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्ये प्रकरणी शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहीमसह चौघांना दोषी ठरवले. 17 जानेवारीला चौघांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 2 जानेवरी रोजी कोर्टाने 16 वर्षे जुन्या या प्रकरणात आरोपी गुरमीत राम रहीम, निर्मल, कुलदीप आणि कृष्ण लाल यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. जज जगदीप सिंह याप्रकरणी निर्णय सुनावला होता. त्यांनीच साधवी लैंगिक शोषण प्रकरणात राम रहीमला शिक्षा सुनावली होती. 

 
रामचंद्र यांनीच समोर आणले होते लैंगिक शोषण प्रकरण 
साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात जी पक्षे लिहिण्यात आली होती त्याआधारे रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित केले होते. छत्रपती यांच्यावर आधी दबाव टाकण्यात आला. धमक्यांना घाबरले नाही तर 24 ऑक्टोबर 2002 ला त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 21 नोव्हेंबर 2002 ला दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 

 
असे घडवले होते हत्याकांड 
बाइकवर आलेल्या कुलदीपने गोळी घालून रामचंद्र यांची हत्या केली होती. निर्मलही त्याच्याबरोबर होता. ज्या बंदुकीने रामचंद्रवर गोळ्या घालण्यात आल्या होत्या त्याचा परवाना डेरा सच्चा सौदाचा मॅनेजर कृष्ण लालच्या नावावर होता. गुरमित राम रहीमवर कट रचल्याचा आरोप होता. राम रहीम सध्या दोन साधवींच्या लैंगिक शोषण प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगतोय. 

 
सिरसा-रोहतकमध्ये कडक सुरक्षा, डेऱ्याचे सर्व कार्यक्रम रद्द 
सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात सिसरा शहरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती. पोलिसांच्या 12 तुकड्या डेरा सच्चा सौदा ते सिरसा शहरापर्यंत तैनात केल्या होत्या. डेऱ्यातील सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत. तसेच डेऱ्यात व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...