Home | International | Other Country | 4 Indians including Indian Govt official killed in Boeing 737 plane crash at Ethiopia

इथियोपिया विमान अपघात: मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या सल्लागारांसह 4 भारतीय, एकूण 157 जणांचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 10:44 AM IST

विमान अपघातात क्रू मेंबर्ससह सर्वांचाच मृत्यू झाला

 • 4 Indians including Indian Govt official killed in Boeing 737 plane crash at Ethiopia

  आदिस अबाबा - इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून नैरोबीला जाणारे विमान उड्डाणानंतर काही वेळातच खाली पडले. या अपघातात विमानातील चार भारतीयांसह सर्व १५७ प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य ठार झाले. मृतांत ३५ देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. त्यातच मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांपैकी एक शिखा गर्ग भारताच्या पर्यावरण मंत्रालयाच्या सल्लागार होत्या. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. मृत्यूमुखी पडलेल्या इतर भारतीयांची नावे वैद्य पन्नागेश भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश आणि नुकावारपु मनीषा अशी आहेत.


  इथिओपिया एअरलाइन्सच्या निवेदनात म्हटले आहे की, हे बोइंग ७३७ विमान गेल्या वर्षीच खरेदी करण्यात आले होते. बोल विमानतळावरून रविवारी उड्डाण घेतल्यानंतर ६ मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानात काही समस्या असल्याचे वाटत आहे, आम्ही परत येऊ का, असा प्रश्न वैमानिकाने नियंत्रण कक्षाला केला होता. त्यानंतर त्याला परतण्याची मंजुरीही मिळाली होती, पण ते परतू शकले नाही. ठार झालेल्यांत सर्वाधिक १८ प्रवासी कॅनडाचे आहेत. त्याशिवाय चीन, अमेरिका, इटलीचे प्रत्येकी ८, फ्रान्स आणि ब्रिटनचे प्रत्येकी सात, इजिप्तचे सहा आणि नेदरलँडचे ५ जण ठार झाले आहेत. अपघाताचे कारण कळू शकले नाही.


  इंडोनेशियात बोईंग प्लेनला असाच झाला होता अपघात
  सहा महिन्यात बोईंग कंपनीला झालेला हा दुसरा अपघात आहे. या आधी गतवर्षी २९ ऑक्टोबर रोजी इंडोनेशियाच्या लॉयन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ मॅक्स ८ ला अपघात झाल्याने त्यात किमान १८९ जणांचा मृत्यू झाला होता.त्यात उड्डाणाच्या १३ व्या मिनिटाला खराबी आली होती. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.


  चारच महिन्यांपूर्वी खरेदी
  विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या मते, बोइंग ७३७ ची चार महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आली होती. हे कंपनीचे सर्वात अपडेटेड व्हर्जन होते. प्रवाशांना आणीबाणीच्या परिस्थितीत उतरवण्याची तयारी झाली होती, असे विमानाच्या ढिगाऱ्यातून दिसून येते.

 • 4 Indians including Indian Govt official killed in Boeing 737 plane crash at Ethiopia
 • 4 Indians including Indian Govt official killed in Boeing 737 plane crash at Ethiopia
 • 4 Indians including Indian Govt official killed in Boeing 737 plane crash at Ethiopia

Trending