Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

4 जानेवारी 2019 आजचे राशिभविष्य : शुक्रवारी या राशींसाठी आहे खास दिवस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2019, 11:02 AM IST

Today Horoscope in Marathi (4 January 2019) शुक्रवारी या राशींना होऊ शकतो लाभ

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  शुक्रवार, 4 जानेवारी 2019 रोजी मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी असून ज्येष्ठा नक्षत्रामुळे वृद्धि नावाचा योग जुळून येत आहे. वृद्धि योगाच्या नावाप्रमाणेच या योगात केलेली कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पूर्णत्वास जातात. या योगात केलेल्या कार्याच्या फळाची उत्तरोत्तर वृद्धिच होत जाते. कोणत्याही वादाविना ही कार्ये पूर्ण होतात. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांची बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 5 राशींसाठी संमिश्र दिवस.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक राशीनुसार राशिभविष्य...

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
  आर्थिक अंदाज कोलमडणार आहेत. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायचा मोह अंगाशी येईल. प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. प्रलोभनांपासून जपायला हवे.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ८
  व्यावसायिक मोठे आर्थिक व्यवहार व विवाह जुळवण्या विषयी चर्चा  दुपारपूर्वीच  करा. वैवाहीक जिवनांत आज तु म्हणशील तसंच हे धोरण ठेवा.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  मिथुन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६
  वैवाहीक जिवनांतील वाद दुपारनंतर मिटतील. महत्वाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. योग्यवेळी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कष्टांचे फळ मिळेल.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  कर्क :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
  कार्यक्षेत्रात प्रगती पथावरुनच तुमची वाटचाल चालू आहे. हितशत्रूंवर मात्र करडी नजर असूद्या. आज दुपारनंतर जरा तब्येत नरम राहील. योग्य सल्ला घ्या.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ८ 
  काही कौटुंबिक कटकटीतून दुपारनंतर उसंत मिळेल.आज प्रिय व्यक्तीस दिलेला शब्द पाळावा लागेल. आज  मुलांचेही लाड आनंदाने पुरवाल. छान दिवस.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ८
  व्यावसायिक उद्दीष्ठे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. योग्य जाहिरातीवरही लक्ष देणे गरजेचे. गप्पांत वेळ दवडून चालणार नाही.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
  आज काही अनुकूल घटनांनी तुमचं मनोबल वाढेल.काही अनपेक्षित लाभ होतील. नेते मंडळींची भाषणे प्रभावी होतील. साहित्यिक मंडळींची उत्स्फुर्तता वाढेल. 

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ६
  समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. सभासंमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल. काही रखडलेली येणी वसूल होण्याची शक्यता.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  धनू :  शुभ रंग : पिस्ता| अंक : ७
  आर्थिक प्रश्न दुपारनंतर सुटणार आहेत. दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. आपल्या स्पष्टवक्तेपणा मुळे कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
  खिसे भरलेले असतील तरी दुपारनंतर रिकामे व्हायला वेळ लागणार नाही. आवक पुरेशी असली तरही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रवास घडण्याची शक्यता आहे.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
  महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

 • आजचे राशिभविष्य 4 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 January 2019 aajche Rashifal

  मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ३
  आज नि:स्वार्थीपणे काही कंटाळवाणी कामेही करावी लागणार आहेत. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.मित्रमंडळींना आज दुरुनच राम राम करणे हिताचे.  

Trending