आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Juvenile Kidnapped And Murdered 14 Year Old Friend To Become A Gangster In Bhind Mp Inspired By Crime Patrol Serial

4 अल्वयीन मुलांना चढली गँगस्टर बनण्याची नशा.. क्राइम शो पाहून केले मित्राचेच अपहरण, सर्वांचे वय 13 ते 15 दरम्यान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंड - मध्य प्रदेशातील 13 ते 15 वयोगटातील चार किशोरवयीन मुलांना गँगस्टर बनण्याची जणू नशा निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी क्राइम शो पाहून तीन दिवसांपूर्वी त्यांच्याच मित्राचे अपहरण केले. नंतर अपहरणाची बाब उघड होण्याच्या भितीने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. 


आरोपींनी मुलाला बेदम मारले 
शहरातील दुर्गा नगर येथील रहिवासी वीरू (13) याचे त्याच्याच वयाच्या चार मित्रांनी सोमवारी अपहरण केलेल होते. ते त्याला फिरण्याच्या बहाण्याने आयटीआयच्या सब स्टेशनच्या मागे असलेल्या जागेत घेऊन गेले. आरोपींनी जेव्हा वीरूला सांगितले की, त्यांनी त्याचे अपहरण केले आहे. तेव्हा त्याने याबाबत आईला सांगणार असल्याचे म्हटले. ते ऐकूण आरोपींनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली त्यात त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळपर्यंत वीरू घरी पोहोचला नाही तेव्हा नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. गरुवारी सकाळी ग्रामीण पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला. 


कॉल डिटेल्सहून उकलले गूढ 
पोलिसांच्या मते, वीरूच्या एका मित्राने फोन करून त्याला फिरण्यासाठी बोलावले. वीरू घरून त्यांच्याबरोबर गेला. त्याचदरम्यान वीरूने त्याच्या आईला फोन केला होता, पण त्या फोन रिसिव्ह करू शकल्या नाहीत. त्याचवेळी मित्रांनी वीरूला सांगितले की, त्यांनी त्याचे अपहरण केले आहे. त्याचवेळी वीरूच्या आईचा फोन आला. तो आई म्हणाला, तेवढ्यात मित्रांनी त्याचा फोन बंद केला आणि मारून मारून त्याची हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर वीरूचे कॉल डिटेल्स घेतले आणि त्यावरून तपास केला, तेव्हा पोलिसांना मित्रावर संशय आला. 


दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद 
आरोपींपैकी एका मुलाशी वीरूचे दोन दिवसांपूर्वीच सायकलवरून भांडण झाले होता. त्यानंतर आरोपी मित्रांना घेऊन वीरूच्या घरी त्याला मारायला गेला होता. पण वीरूच्या आईने रागावून त्यांना हाकलून लावले. पोलिसांनी सांगितले की, या चार मुलांच्या डोक्यावर गँगस्टर बनण्याचे भूत आहे. पैसे कमावण्यासाठी त्यांनी स्वःच्याच मित्राचे अपहरण केले. पण पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. 

 

बातम्या आणखी आहेत...