Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | 4 killed with grooms brother in Car Accident at Beed

कार-ट्रकचा भीषण अपघात..नवरदेवाचा भाऊ, मेहुण्यासह चौघांचा मृत्यू, मुलगा गेला अन् मुलगी विधवा झाली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 24, 2019, 04:59 PM IST

अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तेजस गुजर यांचा भाऊ कुंभेश याचा कपिलधार येथे विवाह होता.

 • 4 killed with grooms brother in Car Accident at Beed

  बीड- कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात नवरदेवाचा भाऊ आणि मेहुण्यासह चौघांची जावेवरच मृत्यू झाला. बीड-सोलापूर महामार्गावर रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाली परिसरात बिंदुसरा तलावाजवळ ही घटना घडली. तेजस गुजर, सौरभ लोहारे, मंगेश कुंकूकरी, अक्षय गाडवे अशी मृतांची नावे असून शुभम दत्तात्रय उंबरे (रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  अंबाजोगाई येथील मोरेवाडी परिसरात राहणाऱ्या व मुळचे बोरी सावरगाव येथील सुभाष गुजर यांचा मुलगा कुंभेश याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील वानेवाडी येथील मुलीशी रविवारी दुपारी बीड तालुक्यातील कपीलधार येथे विवाह होणार होता. यासाठी कुंभेशचा मोठा भाऊ तेजस सुभाष गुजर (रा. अंबाजोगाई) हा आपल्या कारने नातेवाईक सौरभ अरुण लोहारे (रा. लातूर), मंगेश कुंकूकरी (रा. बार्शी), अक्षय महालिंग गाडवे (रा. धानोरा, अंबाजोगाई) व शुभम दत्तात्रय उंबरे (रा. वानेवाडी जि उस्मानाबाद) यांच्यासह कपीलधारकडे येत होते रस्ता खराब असल्याने अंबाजोगाईहून आडस, वडवणीमार्गे ते बीडकडे आले. बीड शहरातून कपीलधारकडे जात असताना पालीजवळील बिंदुसरा प्रकल्पाजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या कारला समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीष होता की, कारच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला.

  अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, मांजरसुंबा महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी जखमी व मृतांना जिल्हा रुग्णालयात आणले. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडीही सुरळीत केली.

  लग्नघरी आक्रोश...

  लहान भावच्या लग्नासाठी येणाऱ्या मोठ्या भावासह इतर नातेवाईकांचा असा अपघाती मृत्यू झाला. काही तासांवर विवाह सोहळा आला असताना अशी घटना घडल्याने लग्नघरी आक्रोश सुरु झाला. अपघाताची माहिती मिळताच लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला होता.

  मुलगा गेला अन् मुलगी विधवा झाली

  सौरभ लोहारे या तरुणासोबत त्याचे मेहुणे मंगेश कुंकूकरी यांचाही मृतात समावेश आहे. अरुण लोहारे यांना सौरभ हा एककुलता एक मुलगा तर एकच मुलगी होती. मुलगा आणि जावयाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभियंता असलेल्या सौरभ महिनाभरापूर्वीच पुण्यात एका कंपनीत रूजू झाला होता. मंगेशही पुण्यातच नोकरीस होते.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो..

 • 4 killed with grooms brother in Car Accident at Beed
 • 4 killed with grooms brother in Car Accident at Beed
 • 4 killed with grooms brother in Car Accident at Beed

Trending