आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणदुरे, कळसकर संबंधित असलेल्या संस्थेचा 4 हत्यांत सहभाग : सीबीआय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

कळसकर, अणदुरे संबंधित असलेल्या संस्थेचा चारही हत्यांत सहभाग हाेता, असे तपासात निष्पन्न झाले अाहे. या प्रकरणात त्यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांचा कालावधी देण्यात यावा, असा युक्तिवाद सीबीआयच्या सरकारी वकिलांनी गुरुवारी कोर्टात केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.   डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात यूएपीए अॅक्ट लावण्यासाठी आणखी मुदत देण्यात यावी, या मागणीसाठी सीबीआयचे वकील पी. राजू यांनी युक्तिवाद केला.

 

संघाच्या लोकांची नावे घेतली जात नाहीत : पुनावळेकर
आरोपी सचिन अणदुरेतर्फे अॅड. संजीव पुनावळेकर यांनी बाजू मांडली. तसेच सरकार पक्षाच्या मागणीला विरोध केला. सचिन अणदुरेला तीन महिने आधीच अटक केली असून त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. आणखी ९० दिवस त्याला अटकेत ठेवणे त्याच्यावर अन्याय आहे.   गौरी लंकेश प्रकरणात तपासात ज्या १२ लोकांना अटक केली आहे त्यातील सहा जणांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे जबाब दिले आहेत. मात्र, संघाचे नाव घेत नाही, असे अॅड. पुनावळेकर यांनी कोर्टाला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...