Maharashtra special / माजी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडून 4 लाख 22 हजार रूपये शासकीय निवासस्थानाचे भाडे वसुल, माहिती अधिकाराचा दणका

माजी राज्य माहिती आयुक्ताला सुध्दा माहिती अधिकाराचा दणका बसला आहे

दिव्य मराठी

May 09,2019 03:00:05 PM IST

यावल-व्ही.डी.पाटीलाचा सरकारी बंगल्यात बेकायदा रहिवास असलेले माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता वसंत दत्तात्रय पाटील यांना जळगांव येथील शासकीय निवासस्थानाचे एकुण भाडे 4 लाख २२ हजार ५९ रूपये भरावे लागले. याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जळगांव जिल्हयातील संघटक सुरेश जगन्नाथ पाटील (रा.यावल) यांनी (दि.09/07/2018) रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगांव यांच्याकडे तक्रार केली होती व आहे. तसेच माहितीच्या अधिकारा अंतर्गत दिनांक 02 जानेवारी 2019 रोजी मिळालेल्या माहितीनुसार कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, जळगांव यांच्याकडे पाटील यांनी दोन वेळा शासकीय घरभाडे भरले असल्याचे उघड झाल्याने माजी राज्य माहिती आयुक्ताला सुध्दा माहिती अधिकाराचा दणका बसला आहे.

आजही व्ही.डी.पाटलाचा शासकीय निवासस्थानावर अनधिकृत कब्जा

जलसंपदा पाटबंधारे अधिकारी शासकीय निवासस्थानात अनाधिकृत कब्जा करून बसलेले माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता व्ही.डी.पाटील हे बेकायदा रहिवास करीत आहे. त्याबाबत व त्यांचे रहिवासाचे अतिक्रमण हटविणेबाबत व शासकीय निवासस्थान खाली करून घेणेबाबत (दि.26/04/2019) रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगांव मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जळगांव कार्यकारी अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगांव अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग शासनाचे अवरसचिव यांना व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे लेखी पोच तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता व्ही.डी.पाटलांकडून शासकीय बंगला खाली होतो किंवा नाही याकडे तसेच संबंधित अधिकारी माजी राज्य माहिती आयुक्त तथा सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता पाटील यांच्या वैयक्तिक व राजकीय प्रभावाला बळी पडतात का? याकडे संपुर्ण जळगांव जिल्हयाचे लक्ष्य वेधुन आहे.

व्ही.डी.पाटील यांचा नमुना (सेवा तपशिल) प्रत्यक्ष बघितला असता ते प्रथम दिनांक 27/10/1980 रोजी सहाय्यक अभियंता श्रेणी (1) या पदावर होते. त्यानंतर दिनांक 08/08/1994 मध्ये कार्यकारी अभियंता, अं.अ.पदावरील पदोन्नतीची दिनांक 23/07/2012 असे असतांना त्यांनी दिनांक 27/10/1980 ते दिनांक 16/03/1985 या कालावधीत सहाय्यक अभियंता श्रेणी-1 ज.पा.विभाग, जळगांव अंतर्गत पाटबंधारे उपविभाग नांदगांव येथे काम पाहिले. नंतर सन 1985 ते 1987 पालखेड कालवा विभाग, नाशिक अंतर्गत पालखेड कालवा उपविभाग 2, सहाय्यक अभियंता म्हणून लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग काम केले. त्यानंतर जामनेर येथे नंतर दिनांक 08/08/1994 ते 31/12/1997 दरम्यान नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळ, नाशिक येथे कार्यकारी अभियंता, दिनांक 01/01/1998 ते 13/08/2001 दरम्यान लघु पाटबंधारे विभागात काम केले. नंतर ते जळगांव तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत लाक्षेविप्र जळगांव दिनांक 14/08/2001 ते 21/03/2003 पर्यंत धुळे पाटबंधारे विभाग,जळगांव येथे कार्यकारी अभियंता दिनांक 21/03/2003 ते 30/06/2004 कालावधीत लघु पाटबंधारे विभागात कार्यरत होते. जळगांव दिनांक 01/07/2004 ते 29/11/2006 कालावधीत कार्यकारी अभियंता म्हणून जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव येथे दिनांक 29/11/2006 ते दिनांक 08/09/2011 कालावधीत कार्यकारी अभियंता म्हणून संकल्पचित्र विभागीय पथक जळगांव दिनांक 08/09/2011 ते दिनांक 16/09/2012 दरम्यान धुळे मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ नंदुरबार येथे कार्यकारी अभियंता मग यानंतर त्याचा शेवटचा कालावधी म्हणजे दिनांक 17/09/2012 ते दिनांक 04/03/2014 पर्यंत जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ,जळगांव येथे अधिक्षक अभियंता म्हणून होते. यानंतर त्यांना दिनांक 15/02/2014 चे स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जानुसार 20 दिवसात स्वेच्छा निवृत्तीची परवानगी मिळवली आहे. अशाप्रकारे त्यांचा 20 ते 25 वर्षाचा सेवा तपशिल आहे. या सेवा तपशिल कालावधीत त्यांनी जळगांव येथील शासकीय निवासस्थान 8 ब मध्ये अंदाजे 20 ते 25 वर्षे एकाच ठिकाणी शासकीय निवासस्थान कायम ठेवले आहे. दिनांक 02/07/2014 मध्ये राज्य माहिती आयुक्त म्हणून व्ही.डी.पाटील यांनी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडून पद व गोपीनियतेची शपथ घेतली होती व आहे. सन 2019 मध्ये त्यांनी राज्य माहिती आयुक्त पदाचा राजीनाम दिला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आजही जळगांव येथील शासकीय निवासस्थान न सोडता आपल्या कब्जात बळकावून ठेवला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता
यांची व्ही.डी.पाटलांनी केली दिशाभूल व फसवणुक राज्या माहिती आयुक्त पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी किंवा अनुभवी इतर क्षेत्रातील व्यक्ती आवश्यक असतांना जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ,जळगांव येथे अधिक्षक अभियंता म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असतांना वसंत दत्तात्रय पाटील यांनी दिनांक 15/01/2014 रोजी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई, मा.उपमुख्यमंत्री, व मा.विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा,मुंबई यांच्याकडे मा.ना.एकनाथराव खडसे यांच्या लेटर हेडवर अर्ज करून त्यावर आपला विश्वासू म्हणून वसंत दत्तात्रय पाटील अधिक्षक अभियंता ज.पा.प्रकल्प मंडळ,जळगांव म्हणून स्वाक्षरी केली आहे. नाथाभाऊच्या लेटरहेडवर राज्य माहिती आयुक्त या पदावर नेमणुक करण्यात यावी अशी विनंती वसंत दत्तात्रय पाटील यांनी करून नाथाभाऊसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता यांची शुध्द दिशाभुल व फसणुक केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. वसंत दत्तात्रय पाटील यांनी राज्य माहिती आयुक्त पद मिळवितांना दिनांक 15/01/2014 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता यांच्या एकाच लेटर हेडवर (नाथा भाऊचे लेटर हेडवर) अर्ज केला, यानंतर दिनांक 15/02/2014 रोजी मा.प्रधान सचिव जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे वसंत दत्तात्रय पाटील यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे.

दिनांक 15/02/2014 ला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्यानंतर दिनांक 04/03/2014 रोजी म्हणजे फक्त 20 दिवसांच्या आंत वसंत दत्तात्रय पाटील यांना शासन सेवेतून सेवा मुक्त करण्यात येत असल्याचा लेखी आदेश दिनांक 05/03/2014 रोजी शासनाचे अवर सचिव यांनी काढला आहे.
राज्य माहिती आयुक्त पद प्राप्त करतांना वसंत दत्तात्रय पाटील यांनी शासनाची, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता यांची शुध्द दिशाभुल व फसवणुक केलेली असल्याचे वसंत दत्तात्रय पाटील यांनी राज्य माहिती आयुक्त पदासाठी जे लाभ घेतले आहेत ते वसुल करून पुढील कार्यवाहीची मागणी भ्र.वि.जन आंदोलन न्यासचे संघटक सुरेश जगन्नाथ पाटील रा.यावल यांनी केली आहे.

X