आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मराठवाडा वॉटर ग्रीड'साठी ११ धरणे करणार 'लूप' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मराठवाड्याच्या सुमारे २ कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. 


या योजनेअंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाइन टाकण्यात येईल. ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिद्धेश्वर, येलदरी, इसापूर, विष्णुपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पद्धतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाइपलाइन प्रस्तावित आहे. 


बीड जिल्ह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी आनुषंगिक कामांसाठी ४ हजार ८०२ कोटींच्या पहिल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. हे पाणी पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. या प्रकल्पासाठी इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायझेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 


अत्यल्प पडणारा पाऊस, भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात झालेली घट, भूजल व भूपृष्ठावरील पाण्याच्या साठ्यात होणारी घट, टँकरच्या संख्येत होणारी वाढ तसेच २०१६ मध्ये लातूर शहरास रेल्वेद्वारे करण्यात आलेला पाणीपुरवठा ही परिस्थिती लक्षात घेता मराठवाड्यात वॉटर ग्रीड निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...