आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Male Students Kidnapped Sexually Assaulted By Local Goons, Made Videos Of Torture In Bihar

हॉस्टेलमध्ये घुसून 4 विद्यार्थ्यांचे अपहरण, मग ओलांडल्या माणुसकीच्या सर्वच मर्यादा, किळसवाणा अत्याचार, Video ही केला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगूसराय - सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. यामध्ये काही गुंड एका युवकाला बेदम मारहाण करताना आणि अमानुष यातना देताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील कुशवाहा हॉस्टलच्या 4 पीडित विद्यार्थ्यांचा आहे. काही गुंडांनी हॉस्टेलमध्ये घुसून 4 विद्यार्थ्यांचे अपहरण केले. पीडितांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांना जनावरांसारखी मारहाण करून नग्न केले. यानंतर चारपैकी दोन जणांसोबत सर्वांनी आळी-पाळीने अनैसर्गिक अत्याचार केला. मेडिकल रिपोर्टमध्ये पीडितांचे आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेच्या रात्री पीडितांपैकी एकाने दैनिक भास्करच्या प्रतिनिधींशी संवाद साधून संपूर्ण हकीगत मांडली. 


अमानुष अत्याचार करून अंगठ्यांवर झाडल्या गोळ्या...
24 ऑक्टोबर रोजी पोखरिया परिसरातील कुख्यात गुंडांनी कुशवाहा हॉस्टेलच्या 4 विद्यार्थ्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना बेदम मारहाण करून बंदूकीचा धाक दाखवला. ठार मारण्याच्या धमक्या देऊन सर्वांचे कपडे काढले आणि 4 जणांपैकी दोघांवर सामूहिक अत्याचार केला. या दरम्यान काही हल्लेखोरांनी पीडित मुलांच्या तोंडात दारु ओतून आणि सागारेट ठेवून फोटो आणि व्हिडिओ देखील काढले. एवढेच नव्हे, तर कानावर देसी कट्टा ठेवून दुर्गा पूजा दरम्यान कथितरीत्या चेन चोरली होती याची कबुली देखील करायला लावली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि शेवटी सर्वांच्या अंगठ्यांवर एक-एक गोळी झाडून त्यांना सोडून पसार झाले.


पोलिसांवर लागले दुर्लक्षाचे आरोप...
पीडित मुलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीगत घटनेच्या दिवशीच रात्री 9 वाजता पोलिसांकडे मांडली. परंतु, पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्यावर विश्वास बसला नाही. त्याच रात्री अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज तिवारी यांनी हे प्रकरण आरओ प्लांटवरून पाणी विकत घेण्यावरून झाला असे सांगितले. सोबतच मुलांवर मारहाणशिवाय दुसरे काही घडले नाही. हे एक किरकोळ प्रकरण आहे असे सांगितले होते. 


12 आरोपींपैकी 6 जणांना अटक 
- यानंतर माध्यमांनी पोलिसांच्या चौकशीवर सवाल उपस्थित केले असता पोलिसांना जाग आली. सुरुवातीला आरोपींच्या विरोधात फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माध्यमांच्या दबाव आणि मेडिकल रिपोर्टनंतर त्यांच्या विरोधात अपहरण आणि अनैसर्गिक कृत्यासह आयटी अॅक्ट आणि इतर गंभीर कलमा लावल्या. सोबतच या प्रकरणाचा कसून तपास केला जाईल असे आश्वासन दिले. मुलांवर अत्याचाराचा व्हिडिओ कुणी बनवला आणि कसा व्हायरल झाला त्या आरोपींचा सुद्धा पोलिस आयटी सेलच्या मदतीने शोध घेत आहेत. 
- या प्रकरणातील मुख्य आरोपी गोलू कुमारसह अजय कुमार, राजा, गणेश कुमार, राहुल कुमार आणि रोहित कुमार या सर्वांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 12 जणांना आरोपी केले आहे. उर्वरीत आरोपींचा शोद घेतला जात आहे. त्यांनी आपला कृत्याची कबुली दिली असून पीडित मुलांचे सर्वच आरोप खरे असल्याचे म्हटले आहे. न्यायलयात हजर केले असता आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...