आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Men Allegedly From IB Arrested For Snooping Outside Exiled CBI Chief Alok Verma Home

तपास संस्थांची लढाई आता रस्त्यावर : अधिकाऱ्यांना रस्त्यावर गचांडी पकडून नेले फरपटत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआयमधील वादाची धग इतर प्रतिष्ठित तपास यंत्रणांनाही बसल्याचे चित्र गुरुवारी दिसलेे. सक्तीच्या रजेवर पाठवलेले सीबीआय संचालक आलोक वर्मांच्या सुरक्षेत तैनात दिल्ली पोलिसांच्या जवानांनी सकाळी ७ वाजता त्यांच्या घराजवळ आयबीच्या ४ अधिकाऱ्यांना पकडले. ओळखप­त्र दाखवल्यानंतरही भररस्त्यात कॉलर पकडून फरपटत २ जनपथमधील वर्मांच्या घरात नेण्यात आले.  साडेसहा तासांच्या चौकशीनंतर दीड वाजता सोडले. 


दिल्लीचे डीसीपी मधुर वर्मा म्हणाले, आयबीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली नाही. आयबी व गृह मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले, हे अधिकारी हेरगिरी नव्हे नियमित गस्तीवर होते. जनपथवर अचानक लोकांची गर्दी वाढल्याची माहिती मिळाली होती. यामुळे आयबीची टीम तेथे गेली होती.

 

सीबीआय प्रमुखांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सक्तीच्या रजेवर पाठवण्यास आव्हान देणारे सीबीआय संचालक आलोक वर्मांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी आहे. त्यांनी सरकारवर तपास संस्थेच्या कामात हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. दरम्यान, सीबीआय अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या मागणीसाठी वकील प्रशांत भूषण यांनीही याचिका दाखल केली आहे. शुक्रवारीच त्याची सुनावणी आहे. त्यांनी चौकशीसाठी एसआयटीची मागणी केली आहे.

 

वर्मा रफाल प्रकरणाचा तपास करत नव्हते : सीबीआय 

रजेवर पाठवल्यानंतरही आलोक वर्मा सीबीआयचे संचालक व राकेश अस्थाना विशेष संचालक असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. एम. नागेश्वर राव यांना अंतरिम संचालक बनवले आहे. सीबीआयच्या संचालकांकडून रफालसह ७ प्रकरणांचा तपास काढून घेतल्याबाबतच्या वृत्तांचाही सीबीआयने स्पष्टपणे इन्कार केला आहे.

 

रफालमुळेच हटवले : राहुल 

रजेवर पाठवल्यानंतरही आलोक वर्मा सीबीआयचे संचालक व राकेश अस्थाना विशेष संचालक असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. एम. नागेश्वर राव यांना अंतरिम संचालक बनवले आहे. सीबीआयच्या संचालकांकडून रफालसह ७ प्रकरणांचा तपास काढून घेतल्याबाबतच्या वृत्तांचाही सीबीआयने स्पष्टपणे इन्कार केला आहे.

 

पुढील स्लाईडवर पहा, कसे घडले प्रकरण 

 

 

बातम्या आणखी आहेत...