आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Per Cent Increase In Inflation Allowance Of Central Employees; 48 Lakh Employees And 65 Lakh Pensioners Will Benefit

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ; 48 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेंशनर्सला होईल फायदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 21 टक्के झाला
  • दर महिन्यांच्या सॅलरीमध्ये 720 रुपये ते 10 हजार रुपये प्रति महिने वाढ

बिझनेस डेस्क- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेमध्ये संसदेत झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीयय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ झाली आहे. या वाढीनंतर डीए 21 टक्के झाला. याचा देशातील 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेंशनर्सला फायदा होणार आहे.

किती फायदा होईल


केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसोबत त्यांच्या दर महिन्यांच्या पगारात 720 ते 10,000 रुपये प्रती महिन्यांची वाढ होईल. केंद्र सरकारने आधीच म्हटले होते की, महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) 1 जानेवारी 2020 पासून केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेंशनर्सला मिळणार आहे. ही वाढीव रक्कम या महिन्यापासून लागू होईल.

यापूर्वी 2019 मध्ये 5 टक्के वाढ झाली होती

यावूर्वी 10 ऑक्टोबर 2019 ला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर भत्ता 12 वरुन 17 टक्के झाला आहे. महाहाई भत्ता आणि महागाई मदत दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलैला दिली जाते.
 

बातम्या आणखी आहेत...