आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला सोडण्यासाठी पोलिसांनी मागितली दीड कोटींची लाच, 1 कोटीमध्ये ठरला सौदा, 11 लाखही दिले; त्यानंतर बिघडला खेळ आणि.......

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली -  दिल्ली पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला सोडण्यासाठी दीड कोटी रूपयांची लाज मागितली होती. आरोपीच्या पत्नीने एक कोटी रूपयांत सौदा पक्का केला होता. त्यातील 11 लाखाची रक्कम देण्यात आली होती. उर्वरीत देय रक्कम मंगळवारी देण्यात येणार होती. पण दोन्ही पक्षांमधील चर्चा बिघडली. 

 

पोलिसांवर लागला ठपका
देय रक्कम देताना मौर्या इंक्लेव्ह भागात त्यांच्यात भांडण झाले आणि हे प्रकरण पोलिसांत गेले. यानंतर प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांवर लाजखोरीचा दाग लागला. एका व्यक्तीला बंदी करून ठेवल्यामुळे आणि जबरदस्तीने खंडणी मागितल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक सुबे सिंह, हेड काँस्टेबल इंदू परमार, काँस्टेबल अजय आणि सचिन या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर रणहौला पोलिस ठाण्याचे एसएचओ यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. 


आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पत्नीकडे मागितली लाच
28 सप्टेंबर रोजी छत्तीसगडमध्ये ऑनलाइन फसवणुकीची नोंद करण्यात आली होती. यामध्ये 6 आरोपींचा समावेश होता. त्यातील 5 जणांना अटक करण्यात आली होती. सहावा आरोपी प्रदीप प्रधान याला तिन्ही पोलिसांनी पकडून उत्तमनगर येथील सचिनच्या घरात डांबून ठेवले होते. त्यानंतर प्रदीपच्या पत्नीकडे त्याला सोडण्यासाठी 1.5 कोटी रूपयांची लाच मागितली होती. 1 कोटीमध्ये हा सौदा ठरवण्यात आला होता. आरोपीची पत्नी नेहाने रविवारी 11 लाख रूपयांची रक्कम पोलिसांनी दिली होती.  ।


पत्नी म्हणाली -  अगोदर पतीला समोर आणा,  येथेच फिस्कटला सगळा खेळ 
मंगळवार रोजी दुपारी मौर्या इंक्लेव्ह येथे उर्वरीत रक्कम देण्यात येणार होती. नेहा आपल्या दोन साथीदारांसह ठरलेल्या ठिकाणी दाखल झाली. तिने रक्कम देण्याअगोदर प्रदीपला समोर आणण्यास सांगितले. यावर पोलिस आणि नेहासोबत आलेल्या साथीदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. चकमक मारहाणीपर्यंत गेली होती. इतक्यात कोणीतरी पीसीआरला संबंधीत प्रकरणाची माहिती दिली. घटनास्थळावर दाखल झालेल्या स्थानिक पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. नेहा स्थानिक पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

बातम्या आणखी आहेत...