आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 4 Rockets Fired At Al Balad Airbase, Third Attack In 6 Days On US Military Bases

अमेरिकेच्या लष्करी तळांवर 6 दिवसांत तिस-यांदा इराणचे रॉकेट हल्ले; पण, इराकचेच सैनिक झाले जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 जानेवारीला अल-असद, इरबिलमध्ये रॉकेट हल्ला, 9 जानेवारीला अमेरीकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला

बगदाद- उत्तर बगदादमधील अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांवर रविवारी 4 रॉकेट हल्ले करण्यात आले. सूत्रांनी सांगितल्यानुसार अल-बलाद एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात 4 इराकी वायु सैनिक जखमी झाले. या एअरबेसवर अमेरिकी सैनिक राहत होते, पण इराण आणि आमेरीकेमध्ये वाढलेल्या तनावामुळे ते आधीच निघून गेले. अमेरीकी सैन्य ठिकाणांवर 6 दिवसातील हा तिसरा हल्ला आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहीले, “इराक सरकारचे शत्रु अनेकवेळा स्वायत्तेचा गैरफायदा घेत आहेत, आता हे बंद व्हायला पाहीजे."

9 जानेवारीला ग्रीन झोनमध्ये मिसाइ हल्ला

बगदादच्या आंतरराष्ट्रीय परिसरात जिथे अमेरीकी दूतावास आहे, तिथे गुरुवारी मिसाइल हल्ला करण्यात आला. यामुळे परिसरात दोन मोठे विस्फोट झाले. अमेरिकेने यामागे इराकमधील इराण समर्थित शिया विद्रोही संघटना ‘हाशेद’ने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला.

इराणने 80 अमेरिकी सैनिक मारल्याचा दावा केला

इराणने 7 जानेवारीला इराकमधील दोन अमेरिकी सैन्य ठिकाणांवर 22 मिसाइल हल्ले केले होते. त्यानंतर यात 80 अमेरीकी सैनिक मेल्याचा दावा इराणने केला होता. पण, अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी या दाव्याचे खंडन केले.

कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणनेचे हल्ले

अमेरिकेने 3 जानेवारीला इराणच्या कुद्स सेनेचा जनरल कासिम सुलेमानीला रॉकेट हल्ला करुन ठार मारले होते. त्यानंतर इराणने अमेरीकेला बदला घेण्याची धमकीही दिली होती. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या  चार दूतावासांना निशाना बनवणार होता. 

बातम्या आणखी आहेत...