Home | National | Delhi | 4 year old child physically abused in school

4 वर्षाच्या मुलीला शाळेत छेडले, डॉक्टरकडे गेल्यावर कळाले काहीतरी वाईट झाले आहे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 11:32 AM IST

मुलीची झाली काउंसलिंग, कर्मचाऱ्यांवर संशय

 • 4 year old child physically abused in school


  दिल्ली- खासगी शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीला छेडल्याची आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकांनी मुलीची तब्येत खराब झाल्याचे सांगून तिच्या घरच्याना बोलवले. तिच्या पालकांनी तिला एका रूग्णालयात घेऊन गेले तेथे तिच्यासोबत काहीतरी वाईट झाल्याचे कळाले.


  - पालकांनी या घटनेची शाळेत तक्रार केल्यावर शाळा प्रशासनाने याला साफ नकार दिला. या घटनेची माहिती मिळल्यावर नाराज लोकांनी शाळेची तोडफोड करत शाळेबाहेर आंदोलन केले.


  शाळेच्या आवारात तणावाचे वातावरण

  घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सगळ्या लोकांना हकलले आणि पीडित मुलीच्या पालकांना आश्वासन दिले की या घटनेची चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा दिली जाईल.


  मुलीची काउंसलिंग, कर्मचाऱ्यांवर संशय

  पोलिसांनी मुलीची काउंसलिंग करून मुलीची साक्ष नोंदवली. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे.

Trending