आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, आजी म्हणाली-सावत्र आईच्या अंगात पहिल्या आईची आत्मा येते, तिनेच मारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानगड - दुर्गाष्टमीला बुधवारी घरांमध्ये होणाऱ्या कन्या पुजनादरम्यान येथील एका घरात चांदणी नावाच्या 4 वर्षीय चिमुरडीचा टाकीत बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला तेव्हा प्रकरणात संशय वाढला. मुलीच्या सावत्र आईने म्हटले, मुलगी खोडकर होती म्हणून सासूने तिला टाकीत बुडवले. तर मृत मुलीची आजी म्हणाली, तिच्या सुनेत आधीच्या सुनेची आत्मा शिरते, तिनेच नातीचा जीव घेतला. 


शेजारी म्हणाले, दोघींनीच मारले 
दुसरीकडे शेजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, मुलीला या दोघींनीच बुडवून ठार केले आहे. चांदणीचे आजोबा घटनेच्या वेळी घरात नव्हते. दुसरीकडे पोलिस म्हणाले की, प्रकरण संशयास्पद आहे पण हत्येचे पुरावे मिळालेले नाहीत. तरीही सर्व दिशांनी तपास केला जात आहे. 


आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी केले होते दुसरे लग्न 
मृत चांदणीच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी अनिल यांनी दुसरे लग्न केले होते. मृत चिमुरडीच्या आजोबांनी पोलिसांत रिपोर्ट दाखल केला. त्यात म्हटले की, ते मुलासह कामावर गेले होते. सून स्वयंपाक करत होती तर मुली नंदिणी आणि चांदणी अंगणात खेळत होत्या. त्यादरम्यान पाण्याच्या टाकीत पडल्याचे चांदणीचा मृत्यू झाला. नंदिणीही अनिलच्या पहिल्या पत्नीचीच मुलगी आहे. 


11 वाजता बुडवले, शेजाऱ्यांनी वाचवले अडीच वाजता पुन्हा बुडवले 
शेजारी बबलू नायकने सांगितले की, सकाळी 11 च्या दरम्यान मुलीला टाकीत फेकले होते. त्यावेळी तिचे रडणे ऐकूण त्यांनी चांदणीला वाचवले होते. पण दुपारी दीड वाजता जेव्हा बबलू परत घरी आला तेव्हा मुलगी टाकीत पडल्याचा गोंधळ सुरू होता. त्यात मुलीचा मृत्यू झाला. 


संशयाची सुई 
घरातील पाण्याची टाकी सहा ते सात फूट खोल आहे. तिच्यावरील झाकण 6-7 किलो वजनाचे आहे. ते मुलीला हटवता येणार नाही. शेजारी पोहोचले तेव्हा झाकण लागलेले होते. ते सरकवून आधी मुलीला सुरक्षित काढले होते. पण दुसऱ्यावेळी शेजारी आले तेव्हा झाकण नव्हते. विचारल्यानंतर असे सांगण्यात आले की, मुलीच्या सावत्र आईच्या अंगात आत्मा आल्याने तिने झाकण हटवले. 

 

बातम्या आणखी आहेत...