Home | National | Gujarat | 4 year old girl physical abuse by father friend in Surat Gujarat

दीड वर्षांच्या भावासोबत लंगडत आली 4 वर्षांची चिमुकली, रक्ताने माखलेले कपडे पाहून आईला आला संशय, नंतर समोर आले सत्य...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 01:45 PM IST

अवस्था अशी झाली होती, की अडीच तास मुलीचे ऑपरेशन चालले

  • 4 year old girl physical abuse by father friend in Surat Gujarat

    सुरत(गुजरात)- शहरात मागील 5 महिन्यात ही चौथी वेळ आहे की, दारूड्यांनी मुलींवर आत्याचार केला आहे. सचिन जीआईडीसीमध्ये आरोपी 4 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून घेऊन गेला आणि तिच्या लहान भावासमोर तिच्यावर बलात्कार केला. आरोपी मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. मुलीला रक्ताने माखलेले पाहून तिच्या आईने वडिलांना सांगितले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केल्यावरही आरोपी आपल्या गु्न्हा कबुल करत नव्हता. त्यानंतर लोकांनी त्याला बेदम मारले आणि त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी लोकांच्या ताबडीतून त्याची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. मुलीची प्रकृती गंभीर असून, तिला जिल्हा रूग्णालयात भर्ती केले आहे.

    आरोपीने मुलीच्या वडिलांसोबत जेवण केले आणि नंतर मुलीला उचलून घेऊन गेला
    मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मंगळवारी त्यांना सुट्टी होती. आरोपी त्यांच्या मित्र आहे, सकाळी 11 वाजता तो जेवण करायला आला होता. जेवण करून तो निघाला तेव्हा मुलगी आणि तिचा दिढ वर्षांचा भाऊ खेळत होते. आरोपी कुबेरने त्यांना चॉकलेट देण्याचे बहाण्याने उचलून घेऊन गेला. त्यानंतर निर्जण स्थळी नेऊन लहान भावासमोरच मुलीवर बलात्कार केला आणि नंतर परत घराजवळ सोडले.

Trending