आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षीय चिमुकलीवर 13 वर्षीय मुलाने केला बलात्कार, नंतर कोणाला कळेल या भीतीपोटी प्राषण केले विष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बठिंडा(पंजाब)- जिल्ह्यातील एका गावात 4 वर्षीय चिमुकलीसोबत शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय मुलाने बलात्कार केला. त्यानंतर पकडले जाऊ या भीतीने त्याने विष प्राषण केले. सध्या त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी पीडित मुलीला मेडिकलसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.

 

गावच्या सरपंचांनी सांगितरे की, शुक्रवारी दुपारी 3 वाजता मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती. त्यानंतर तिच्या आईने तिला शोधणे सुरू केले. त्यानंतर समोरच्या घरात मुलीला पाहायला गेल्यावर दिसले की, मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती आणि ती रक्ताने माखलेली होती. तिच्या बाजुलाच आरोपी मुलगाही होता.

 

त्यांना पाहून मुलीच्या आईने आरडा-ओरड सुरू केली, त्यानंतर घाबरलेल्या मुलाने घरातील विषारी दृव्य प्राषण केले. त्याची प्रकृती घराब झाल्यामुळे त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले.