आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेलेल्या लोकांशी बोलतो 4 वर्षांचा चिमुरडा, आधीच्या जन्मात मृत्यू कसा झाला होता हेही सांगतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समरसेट - इंग्लंडमधील एक महिला तिच्या मुलाच्या विचित्र वागण्याने त्रस्त झाली आहे. मेगन बॅटीचे म्हणणे आहे की, तिचा चार वर्षांचा मुलगा चार्ली मेलेल्या लोकांशी बोलतो. एवढेच नाही तो गेल्या जन्माबद्दलही बोलतो. त्याने पहिल्यांदा बोलणे सुरू केले तेव्हापासून हे सुरू आहे. चार्ली पूर्वीच्या जन्मात त्याचा मृत्यू कसा झाला होता, त्या जन्मातील पित्याचा जन्म कसा झाला होता, हेही सांगतो. चार्लीच्या बोलण्यामुळे त्याच्या टिचरही अचंबित झाल्या आहेत. 


असा झाला गेल्या जन्मात मृत्यू 
मेगन सांगतात की, त्यांचा लहान मुलगा बऱ्याच विचित्र गोष्टी बोलतो. तो नेहमी पूर्वीच्या जन्माबाबत बोलत असतो. गेल्या जन्मात श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे तो सांगतो. तर वडिलांचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला होता, असे तो सांगतो. मेगन पुढे म्हणाली, त्याला काही विचारले की तो काही बोलत नाही. पण अचानक काहीतरी भयावह बोलू लागतो. 


शाळेतून आला टिचरचा फोन 
मेगनला एकदिवस अचानक शाळेतून फोन आला. टिचरने विचारले की चार्लीच्या वडिलांना काय झाले आहे? मेगनने उत्तर दिले की, ते अगदी ठीक आहेत. टिचरने सांगितले की, चार्ली वडील बुडून मृत पावल्याबाबत बोलत होता. त्यानंतरसमगन घाबरून गेल्या. 


आईला वाटते मृत लोकांशी बोलतो 
मेगनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावरही शेअर केला आहे. त्याच मुलाच्या वर एक विचित्र प्रकाश दिसतोय. मेगनच्या मते तिच्या मुलाला काहीतरी शक्ती प्राप्त असून तो मृत लोकांशी बोलत असावा. मेगन सांगते की, त्याला जुन्या काळातील लोकांची नावेही माहिती आहेत. चार वर्षांचा असताना त्याला हे सर्व कसे माहिती आहे, याचा विचार करूनच चार्लीची आई घाबरून गेली आहे. 


तज्ज्ञ काय म्हणतात 
पॅरानॉर्मल एक्सपर्ट जुली कॉक्राफ्टने या प्रकरणात रस दाखवला. जुली म्हणाली की, हे अत्यंत रंजक आहे. नक्कीच या मुलाच्या मेंदूत गेल्या जन्मातील गोष्टी अजूनही घर करून आहेत. तो त्याबाबतच बोलतो. एवढ्या कमी वयाच मुले विनाकारण असे काही बोलत नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...