आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांच्या मुलाने केला असा रॅप की, चांगले चांगले रॅपरही त्याच्यासमोर पडतील फिके, व्हिडीओ पाहून बादशाहने दिले 100 मधून 200 मार्क 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये योयो हनी सिंह, बादशाह, रफ्तार आणि फाजिलपुरिया असे अनेक रॅपर्स आहेत. पण एक लिटिल रॅपर लोहितचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसे तर रॅप सॉन्ग म्हणणे काही लहान मुलांनाच खेळ नाही, पण या 4 वर्षांच्या लोहितने ज्या पद्धतीने रॅप गायले आहे, ते पाहून बादशाहने देखील त्याचे भरभरून कौतुक केले. बादशाहने स्वतः आपल्या सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये लोहित त्याचेच रॅप सॉन्ग 'शी मूव्ह इट लाइक' गाण्याच्या ओळी गातांना दिसत आहे. 

बादशाहने शेयर केलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. काही तासातच व्हिडिओला 4 लाखपेक्षा जास्तवेळा पहिले गेले आहे. लिटिल रॅपर लोहितचे स्वतःचे एक इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि त्यावरही त्याने बादशाहचे गायलेले अनेक रॅप सॉन्गचे व्हिडीओ शेयर केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...